Home चंद्रपूर वंचितचे माजी सावली शहर अध्यक्ष, उपाध्यक्षासह कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल विरोधी पक्षनेते विजय...

वंचितचे माजी सावली शहर अध्यक्ष, उपाध्यक्षासह कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत पक्ष प्रवेश

वंचितचे माजी सावली शहर अध्यक्ष, उपाध्यक्षासह कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत पक्ष प्रवेश

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी 

चंद्रपूर

सावली:-वंचितचे धडाडीचे कार्यकर्ते माजी शहर अध्यक्ष रोशन बोरकर, नितीन दुधे व भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांसह कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कार्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे सावली शहरात इतर पक्षातून इन्कमिंग सुरु असल्याचे चित्र आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्यात वाढता प्रभाव व शहरातील विकास कामांचा झंझावात बघता इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा इन्कमिंग सुरु असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, शहर उपाध्यक्ष नितीन दुधे यांनी प्रवेश केला. तर शहरातील भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांनीही कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी येथील कार्यक्रमात विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसाण यांचे हस्ते पुष्पगुछ देऊन करण्यात आला. यावेळी सोनी नितीन दुधे, मीनाक्षी मिलिंद वाळके, लोमेश दासरवार, रोहित आलेवार, प्रज्वल पवार, विशाल लाटेलवार, सौरभ गोरडवार, निलेश येनुगवार, रवी वाढई, सुमित लेनगुरे, हर्षद मोहुर्ले, गणेश वाढई, महेश मांदाडे, मिलिंद शेंडे, सुरज लेनगुरे यांनी प्रवेश केला.यावेळी सावली उपनगराध्यक्ष संदिप पुण्यपकार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, पाणी पुरवठा सभापती सभापती प्रितम गेडाम, नगरसेवक गुणवंत सुरमवार, प्रकाश जक्कुलवार, प्रशांत राईचवार, चंद्रकांत संतोषवार, नगरसेवक मुन्ना रस्ते, आकाश खोब्रागडे, निखिल दुधे, गब्बर दुधे, मयूर दुधे, धम्मदिप बोरकर, अनिकेत वाळके, मिथून गणविर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here