अतुल दिघाडे
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल
वरोरा विधानसभा क्षेत्रात, निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांना डावलून, खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल…..
महाराष्ट्र :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज, 24 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 7 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल केलेल्या मतदारसंघांची माहिती:
70 – राजुरा विधानसभा मतदारसंघ
– सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
– वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष)
71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ
– सुरेश मल्लारी पाईकराव (अपक्ष)
72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ
– निरंक
73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ
– विजय नामदेवराव वडेट्टीवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
74 – चिमूर विधानसभा मतदारसंघ
– किर्तीकुमार भांगडीया (भारतीय जनता पार्टी)
– सतिश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
75 – वरोरा विधानसभा मतदारसंघ
– प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
विशेषतः वरोरा विधानसभा क्षेत्रात, निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांना डावलून, खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज एकूण 121 अर्जांची उचल करण्यात आली, ज्यामध्ये विविध उमेदवारांनी विविध पक्षांचे प्रतिनिधित्व केले आहे.