Home मुंबई मनसेच्या शॉडॊ कैबिनेटमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप ?

मनसेच्या शॉडॊ कैबिनेटमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप ?

महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर मनसे नजर !

मुंबई :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी विकासात्मक कामे व्हावी व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर वचक रहावी याकरिता मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शॉडॊ कैबिनेटची निर्मिती करण्यात आली, जर सरकार बरोबर काम करीत नसल्यास सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू असे आव्हान या प्रसंगी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी शॉडॊ कैबिनेटच्या सर्व सभासदांना केले आहे. मनसेच्या या शॉडॊ कैबिनेट मुळे महाराष्ट्रच्या राजकारणात जणू भूकंप आला की काय ? अशी स्थिती दिसत आहे. आजपर्यंत मंत्रिमंडळात मंत्री जो करेल ती पूर्व दिशा अशी अवस्था होती मात्र आता त्यावर मनसेचे प्रतिरूप सरकार हे वचक ठेवणार असून कैबिनेट मधे झालेल्या निर्णयाबद्दल मनसे कैबिनेट विचार मंथन करून झालेला निर्णय योग्य की अयोग्य यांवर निर्णय करून जनतेच्या हिताच्या द्रुष्टीने प्रयत्न करणार आहे.

काय आहे शॅडो कॅबिनेट ?

विरोधकांनी स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये सत्ताधारी गटाने जी लोकोपयोगी खाती किंवा विभाग तयार केलेले असतात, त्या विभागाचे, विषयाचे जाणकार किंवा तज्ज्ञ असावेत अशी अपेक्षा असते. म्हणजे सरकारच्या संबंधित खात्याच्या एखाद्या मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर त्याचं योग्य विश्लेषण करण्याची शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांची क्षमता असावी हे अपेक्षित असतं. शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांना शॅडो मंत्री म्हटलं जातं. त्यांच्या विश्लेषणाला किंवा टीका-टिप्पणीला सत्ताधारी मंत्र्यांइतकंच स्थान प्रसारमाध्यमांमध्ये मिळतं. शॅडो कॅबिनेटचा प्रमुख म्हणजे संबंधित सरकारमधील विरोधी पक्षनेता असतो. असाच प्रयोग आता मनसे करणार आहे. पाश्चिमात्य देशात सत्ताधारी गटाने त्यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप केल्यानंतर विरोधकांच्या शॅडो कॅबिनेटची जनतेला उत्सुकता असते. यामुळे राज्यकर्त्यांवर वचक राहतो. शॅडो कॅबिनेटमधील मंत्री जास्त अभ्यासू आणि तज्ञ आहेत की सरकारमधील मंत्री यावरही युरोपीय देशात चर्चा होतात. विरोधकांच्या शॅडो कॅबिनेटमुळे सत्ताधारी गटांना अनिर्बंध किंवा मनमानी कारभार करता येत नाही. कारण त्यांच्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी शॅडो कॅबिनेटमधील मंत्री तत्पर असतात.
या संदर्भातील मनसेच्या प्रतिरूप कॅबिनेटची घोषणा पक्षांच्या वर्धापन दिनी करण्यात आली. मनसेच्या या शॅडो कॅबिनेटमधे खालील नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, त्यामधे
गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन-
बाळा नांदगावकर
किशोर शिंदे
संजय नाईक
राजू उंबरकर
राहुल बापट
अवधूत चव्हाण
प्रवीण कदम
योगेश खैरे
माजी पोलीस अधिकारी बुद्धिवंत
प्रसाद सरफरे
डॉ. अनिल गजने
अ‍ॅड. रवींद्र पाष्टे
अ‍ॅड. जमीर देशपांडे
अ‍ॅड. दीपक शर्मा
अनिल शिदोरे – जलसंपदा

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-
अनिल शिदोरे
अमित ठाकरे
अजिंक्य चोपडे
केतन जोशी

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-
नितीन सरदेसाई
हेमंत संभूस – (उद्योग)
वसंत फडके
मिलिंद प्रधान
पीयूष छेडा
प्रीतेश बोराडे
वल्लभ चितळे
पराग शिंत्रे
अनिल शिदोरे – वित्त व नियोजन

महसूल आणि परिवहन-
अविनाश अभ्यंकर
दिलीप कदम
कुणाल माईणकर
अजय महाले
संदीप पाचंगे
श्रीधर जगताप

ऊर्जा-
शिरीष सावंत
मंदार हळबे
सागर देव्हरे
विनय भोईटे

ग्रामविकास-
अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर
अमित ठाकरे
परेश चौधरी
प्रकाश भोईर
अनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-
संजय चित्रे
अमित ठाकरे
वागिश सारस्वत
संतोष धुरी
आदित्य दामले
ललीत यावलकर

शिक्षण-
अभिजीत पानसे
आदित्य शिरोडकर – उच्च शिक्षण
सुधाकर तांबोळी
चेतन पेडणेकर
बिपीन नाईक
अमोल रोग्ये

कामगार-
राजेंद्र वागस्कर
गजानन राणे
सुरेंद्र सुर्वे

नगरविकास आणि पर्यटन-
संदीप देशपांडे
अमित ठाकरे
पृथ्वीराज येरुणकर
कीर्तिकुमार शिंदे
उत्तम सांडव
हेमंत कदम
योगेश चिले
संदीप कुलकर्णी
फारुक डाला

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण-
​​​​​​​रिटा गुप्ता
कुंदा राणे

सहकार आणि पणन-
दिलीप धोत्रे
कौस्तुभ लिमये
वल्लभ चितळे
जयदेव कर्वे

अन्न व नागरी पुरवठा-
राजा चौगुले
महेश जाधव
वैभव माळवे
विशाल पिंगळे

मत्स्यविकास आणि बंदरे-
परशुराम उपरकर
जितू चव्हाण
निशांत गायकवाड

महिला व बालविकास-
शालिनी ठाकरे
सुनिता चुरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता)-
योगेश परुळेकर
अभिषेक सप्रे
सीमा शिवलकर

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)-
संजय शिरोळकर

रोजगार हमी आणि फलोत्पादन-
बाळा शेडगे
आशिष कोरी

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार-
अमेय खोपकर

कृषी व दुग्धविकास-
संतोष नागरगोजे
संजू पाखरे
अमर कदम

कौशल्य विकास व उद्योजकता-
स्नेहल जाधव

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य-
गजानन काळे
अ‍ॅड. संतोष सावंत
अनिल करपे

ग्राहक संरक्षण-
प्रमोद पाटील

राज्य उत्पादन शुल्क-
वसंत फडके

आदिवासी विकास-
आनंद एंबडवार
किशोर जाचक
परेश चौधरी

पर्यावरण-
रुपाली पाटील
कीर्तिकुमार शिंदे
जय शृंगारपुरे
देवव्रत पाटील

खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन-
अनिता माजगावकर

पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता-
अरविंद गावडे

क्रीडा व युवक कल्याण-
विठ्ठल लोकणकर
अरुण जांभळे

अल्पसंख्याक विकास आणि वक्फ-

हाजी सैफ शेख
इरफान शेख
जालीम तडवी
जावेद शेख
अल्ताफ खान

Previous articleचंद्रपूर तहसील प्रशासनाची वाळु तस्करा सोबत साठगांठ कोट्यावधीची रेती तस्करी ?
Next articleहोळीच्या दिवशीच तरुणाचा पाण्यात बुडून म्रुत्यु !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here