Home वरोरा होळीच्या दिवशीच तरुणाचा पाण्यात बुडून म्रुत्यु !

होळीच्या दिवशीच तरुणाचा पाण्यात बुडून म्रुत्यु !

अनिकेतच्या दुर्दैवी म्रुत्युने पिंपळशेंडे परिवारात पसरली शोककळा ! 

वरोरा प्रतिनिधी :-

अनिकेत गोपाल पिंपळशेंडे वय २३ वर्ष राहणार गजानन नगर वरोरा, हा युवक आपल्या मित्रांसोबत काल दिनांक १० मार्च रोज मंगळवारला होळी खेळल्या नंतर दुपारी जवळपास ३,००वाजता वरोरा तालुक्यातील मार्डा या गावाशेजारी असणाऱ्या वर्धा नदी बंधारा जवळ आंघोळ करण्याकरिता गेला होता. त्यामधे सर्वच मित्र आंघोळ करीत असतांना एक युवक पाण्यात बुडायला लागला असता अनिकेत पिंपळशेंडे या तरुणांनी त्याला अलगद बाहेर काढले, पण काही क्षणातच परत अनिकेत पोहायला खोल पाण्यात गेला असता तो खोल पाण्यात बुडाला तो वरती आलाच नाही, त्या क्षणी सर्व मित्र गोंधळले आणि त्यांनी आरडाओरडा केला पण कुणाचीही हिंमत त्याला बाहेर काढण्याची झाली नाही, ही बातमी वाऱयासारखी पसरली आणि काही मच्छिमार यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण या दरम्यान अंधार झाल्यामुळे त्याला आज दुपारी बाहेर काढण्यात यश आले, या घटनेच्या धक्क्याने अनिकेतचे आई वडील यांना मोठा धक्का बसला आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात सुद्धा आले. काल दुपारी ३,३० ते ४,०० वाजता आपल्या ९ मित्रांसोबत होळी करून आंघोळीला गेलेला अनिकेत परत आलाच नाही ह्या दुखःने पिंपळशेंडे परिवारावर शोककळा पसरली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here