Home चंद्रपूर शेवटी रेती माफियांची मस्ती पत्रकारांनी जीरवली ?

शेवटी रेती माफियांची मस्ती पत्रकारांनी जीरवली ?

गोमती पाचभाई यांचे वाळू तस्करांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अवैध रेती घाटाचे सांगोडा व वनोजा येथील चोरटे मार्ग बंद..

कोरपना (प्रतिनिधी):-

काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी कोरपणा तालुक्यातील सांगोडा व वनोजा येथील चोरट्या मार्गाने वर्धा नदीतून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्रीकरण केले होते व त्या क्षणी वाळु तस्करानी पत्रकारांशी हुज्जत घालून प्राणघातक हमला केला होता, मात्र पोलिसांशी वाळु तस्कराचे असलेले साटेलोटे आणि तहसीलदार यांचे अर्थपूर्ण सबंध यामुळे या प्रकरणात वाळु तस्करावर गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी अर्थपूर्ण तडजोड केली आणि शासनाचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पत्रकारांवरच गुन्हे दाखल करण्याची धमकी पत्रकारांना दिली होती

मात्र तरीही गोमती पाचभाई यांच्या नेत्रुत्वात रेती माफीयाविरोधात जिल्हाधिकारी यांना कारवाई करा अन्यथा आम्हांला सुद्धा आंदोलने करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता, याबाबत स्वत: जिल्हाधिकारी यांनी कोरपना तालुक्यातील तहसीलदार यांना बगल देत थेट उपविभागीय अधिकारी यांना सूचना केल्या आहेत.  वाळू उपसा रोखण्या बाबतच्या कामकाजात जे अधिकारी, कर्मचारी चालढकलपणा करतील त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असणार आहे असे जिल्हाधिकारी यांना संकेत दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील भोयगाव, सांगोडा, वनोजा, तुळशी,कोळशी, कवठाळा या वाळू पट्यांमधून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. याबाबत   तालुका स्तरावर तहसिलदार यांच्याकडून ठोस प्रतिबंध होत नसल्याने वाळू उपशाला बळ मिळत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

मात्र गोमती पाचभाई यांनी 6 मार्च ला जिल्हाधीकारी यांची भेट घेऊन वैनगंगा व वर्धा नदी पात्रातुनच वाळु अवैध उपसा केल्या जात आहे. या मध्ये अनेक अधिकारी, दालाल आपले हात ओले करीत आहे  कोरपना तालुक्यात सुरु असलेले अवैध उत्खनन व वाहतुकीकरिता प्रशासनांकडून होत असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष व वाळू तस्करांशी असलेले साटेलोटे याबाबतची संपूर्ण माहिती दिली असता आता याप्रकरणाकडे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी लक्ष घातले असून याबाबत संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश दिले असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हाधिकारी  यांना माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राजुरा,  कोरपना तहसीलदार तसेच अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेत वाळु माफीयावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. सांगोडा,वनोजा,
इरई तुळशी, भोयगाव येथे या वाळु पट्यात वाळु माफीया सक्रीय आहेत.  वाळु माफीया केराची टोपली दाखवत अवैद्य वाळु उपसा अधिकाऱ्यांच्या  संगनमताने करतात याची दखल जिल्हाधिकारी  यांनी घेतली आहे. यामुळे यापुढे अवैद्य वाळु उपसा करणाऱ्यांवर  कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. यामधुन आधिकारी ही सुटणार नसल्याने आधिकार्यांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हाधिकारी यांना कोरपना तालुक्यातील वाळू तस्करी बद्दल निवेदन देऊन गोमती पाचभाई यांनी 3 दिवसाचे आत तात्काळकार्यवाही न झाल्यास संपूर्ण महसूल प्रशासनिक अधिकाऱ्यांवर बहिष्कार घालत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर 7 मार्च ला रात्री रेती तस्करांवर पहारा ठेऊन  रात्री उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर यांना सुद्धा सांगोडा येथील रेती घाटावर  अवैध वाळू उपसा सुरू असल्याबाबत माहिती देत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार कोरपना यांच्याकडे  कार्यवाहीचा वारंवार तगादा लावला होता.

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरपना तहसिलदार यांनी सांगोडा व वनोजा अवैध रेती घाटावरच्या मार्गावर जेसीबीने नाली खोदून रस्ता बंद केला आहे.संबधित मडंळ अधिकारी यांनी रेती चोरीस आळा घालण्यासाठी चोरट्या रस्त्यावर जेसीबीने खड्डे रस्ते बंद करण्यात आले आहे.या कार्यवाहीमुळे अवैध  वाळू माफियांना जबर धक्का बसला असून यासोबतच तालुक्यातील शेती उपयोगाकरिता परवाना घेतलेल्या सर्व ट्रॅक्टर ची जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना तक्रार सादर करणार असल्याचे कळविले आहे.

Previous articleहोळीच्या दिवशीच तरुणाचा पाण्यात बुडून म्रुत्यु !
Next articleभारतात कोरोनाचा पहिला बळी, कर्नाटकातील ७६ वर्षीय व्यक्तीचा म्रुत्यु !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here