भारतातील आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा झाल्या सतर्क,
कोरोना अपडेट :-
जगभरात ‘कोरोना’ची दहशत पसरली असतांना आजपर्यंतच्या सर्व विदेशातून आलेल्या व्यक्तींच्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या मात्र कोरोना हा रोग झाल्याचे कुठल्याही तपासणी मधे शीद्ध झाले नव्हते मात्र आता कोरोना व्हायरसने भारतात देखील शिरकाव केला आहे. एकीकडे महाराष्ट्रात पुण्यात विषाणूचा संसर्ग झाल्याचे काही रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला आहे, त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे भारतात कोरोना व्हायरसमुळे पहिला बळी गेल्याची माहिती मिळत आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील ७६ वर्षीय स्थानिक व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण दुबईहून कर्नाटकात परतला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.