Home वरोरा मोदी सरकारने चालवली शेतकऱ्यांच्या हमीभावाची थट्टा ?

मोदी सरकारने चालवली शेतकऱ्यांच्या हमीभावाची थट्टा ?

शेतकऱ्यावर वरून राजा व व्यापाऱ्यांचा सुद्धा कोप ?

वरोरा प्रतिनिधी किशोर डुकरे :-

शेतकऱ्यांना हमीभाव देवू अशी आरोळी ठोकनाऱ्या मोदी सरकारने अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे, उत्पादन किमतीच्या दीड पट भाव देणारे मोदी सरकार आता शेतकऱ्यांना फसवत असल्याचे चित्र आहे, परंतु किमान ठरलेला हमीभाव तरी शासनाने द्यावा अशी शेतकऱ्यांची इच्छा असतांना बाजार समिति आणि खाजगी व्यापार मंडई मधे सुद्धा शेतकऱ्यांच्या धान्न्याला हमीभाव मिळत नसल्यामुळे शासनानेच काढलेल्या अध्यादेशाचे पालन सुद्धा होत नसल्याचे दिसते, कारण जर एखादा व्यापारी किंव्हा बाजार समिति मधील दलाल जर शेतकऱ्यांच्या शेतपिकाला हमीभाव देत नसेल तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई होऊन त्याचे लायसन्स रद्द करण्याची व प्रसंगी त्यांचेवर फौजदारी कारवाई करण्याची तरतूद असतांना वरोरा तालुक्यात खुलेआम शासनाच्या अध्यादेशाची अवहेलना होत आहे परंतु संबंधित अधिकारी मात्र त्यांचेकडे तक्रार देवूनही साखर झोपेत असल्याने त्या अधिकाऱ्यावरच करवाई करण्याची आता गरज आहे.

या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी सुखावला होता त्याला वाटत होते कि या वर्षी रब्बी माल चांगला होईल व केंद्र सरकारने ठरवलेला हमी भाव मिळेल पण असे न होता सरकार आणि व्यापारी या दोघांच्याही संगमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असून याकडे कोणत्याच लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही, चना प्रति क्विंटल 1500 रु नी व्यापारी लूट करत आहे, सरकारने हमी भावाने तसेच नगदी चुकारे न देनाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाही करू असे आदेश काढले होते परंतु आता पर्यंत कोणत्याच व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांची मुजोरी वाढली असून सरकार हतबल तर लोक प्रतिनिधी आंधळे बहिरें आणि गुंगे झाले आहे आणि म्हणून आता शेतकऱ्यांनीच या विरोधात रस्त्यावर येण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here