Home चंद्रपूर महाकाली कॉलरी येथून दारूमाफिया अमित गुप्ताची पकडली दारू ,

महाकाली कॉलरी येथून दारूमाफिया अमित गुप्ताची पकडली दारू ,

अमित गुप्ताची महाकाली पोलिस चौकीत सेट्टिंग? गुन्हा दाखल होणार कां याबाबतसंशय असतांना शेवटी गुन्हा दाखल ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परिसरात राजेश  गुप्ता उर्फ भहुवा गुप्ता व अमित गुप्ता हे  अवैध दारू विक्रीच्या धंद्यात मोठा पुरवठा करणारे  दारू माफिया असून दररोज लाखों रुपयाची दारूची आवक याच्या माध्यमातून महाकाली कॉलरी परिसरात होत आहे,
काल दिनांक ११ मार्चला रात्री ८,३० ला महाकाली कॉलरी कैण्टिंग चौका जवळ तब्बल ५५ देशी दारूच्या पेट्या पोलिसांनी जब्त केल्या होत्या मात्र या दारूच्या पेट्या ह्या अमित  गुप्ताच्या असतांना सुद्धा व तो पोलिसांसोबत आरोपी गूप्तगू करीत असतांना सुद्धा सुरुवातीला आरोपीला पोलिस अटक करतांना दिसत नव्हते, याचा अर्थ पोलिस आरोपीला सोडून देवून पकडलेल्या दारूच्या साठय़ाला लावारीस असल्याचे दाखवणार असल्याचे दिसत होते मात्र या  प्रकरणी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बहादुरे यांनी अधिक चौकशी करून दारू माफिया अमित  गुप्ता याचेवर  दाखल करून कारवाई केली आहे.

Previous articleमोदी सरकारने चालवली शेतकऱ्यांच्या हमीभावाची थट्टा ?
Next articleज्याचा घरातील अंगणात पराभव होतो तो रणांगणात टिकत नाही, मूल्यवर्धन मेळाव्यात पाटील यांचे प्रतिपादन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here