मागासवर्गी्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन न्यायालयातून नोकर भरती रद्द होण्याची शक्यता.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., चंद्रपूर यांच्या अध्यक्ष संतोष रावत आणि संचालक मंडळाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोबतच सर्वोच्य न्यायालयाचा अवमान करून शासन निर्णय सुद्धा विचारात न घेता केवळ शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अभिमतांवर बैंक नोकर भरतीत आरक्षण हटवून जी बेकायसदेशीर भरती प्रक्रिया सुरु केली होती व जिल्ह्यातील हजारो एससी, एसटी, ओबीसी व विमुक्त भटक्या जमातीच्या सुशिक्षित तरुण बेरोजगार यांच्यावर अन्याय केला होता त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात या बेकायदेशीरपणे होणाऱ्या नोकर भरती विरोधात आवाज उचलून ITI या कंपनीच्या माध्यमातून बोगस पणे घेतली जाणारी नोकर भरतीला स्थगिती देऊन निस्पक्षपणे व पारदर्शी पद्धतीने नोकर भरती करणाऱ्या टीसीएस या कंपनी कडून नोकर भरती घ्यावी अशी मागणी सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दिली होती, त्या तक्रारी वरून चौकशी सुरु झाली व तसें आदेश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर भि. कल्याणकर यांना दिल्याने आता ह्या नोकर भरतीला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. बैंक व्यवस्थापनानी ही भरती प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची जाहीर सूचना काढली जरी असली तरी या नोकर भरतीवर स्थगिती येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान मनसेच्या पाठपुराव्याला हे मोठे यश आले असून बैंकेच्या नोकर भरतीत एससी, एसटी, ओबीसी व विमुक्त भटक्या जमातीच्या आरक्षसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याची माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिली आहे.
काय आहे बैंकेची नवी जाहीर सूचना
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दि. ६/१०/२०२४ ला प्रकाशित केलेल्या जाहीरातीनुसार बँकेच्या रिक्त ३५८ पदाची पदभरती ऑनलाईन पध्दतीने करणेकरीता दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान लिपीक व शिपाई पदाकरीता लेखी परिक्षा घेण्याचे नियोजीत केले होते.
सदर कालावधीत राज्यात विधानसभा निवडणुक संदर्भातील आदर्श आचारसंहीता लागू असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, चंद्रपूर हयांच्या सूचनेप्रमाणे, दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ ला आयोजीत केलेली परिक्षा आदर्श आचारसंहिता कालावधी संपेपर्यंत पुढे ढकलण्यांत आलेली आहे. तरी परिक्षार्थी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी. तसेच परिक्षा आयोजनाबाबत नविन परिक्षा तारखा बँकेच्या www.cdccbank.co.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येईल, हयाची कृपया नोंद घ्यावी. अशा प्रकारची जाहीर सूचना चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर भि. कल्याणकर यांनी प्रसिद्ध केली आहे.