विजय वडेट्टीवार यांचे चंद्रपूर च्या जाहीर सभेत जनतेला आवाहन . चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात वारं बदललं.
चंद्रपूर :-
राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप ने पक्ष फोडली घरे फोडली आणि सत्तेत येताच जनतेला दिलेली शेतकरी कर्जमाफी रोजगार निर्मिती, सर्वांगीण विकास हि सर्व आश्वासने विसरून व्यापारी हित जोपासण्यासाठी येथील जनतेला वाऱ्यावर सोडून देशातील व्यापाऱ्यांचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. ही पक्ष फोडीतून स्थापन झालेली महायुती जनतेचा विश्वासघात करणारी असून या निष्ठुर व जनविरोधी सरकारला सत्तेतून खाली खेचा व महाविकास आघाडी व घटक पक्ष तथा काँग्रेसच्या एकनिष्ठ उमेदवार प्रवीण पडवेकर यांना विजयी करा असे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव मुकुल वासनिक यांच्यासह राज्याचे विरोध पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना केले. दरम्यान चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भाजप कडून उभे असलेले दलबदलू, धोकेबाज व खोकेवाल्या किशोर जोरगेवार यांना धडा शिकवा असे आवाहन सुद्धा करण्यात आले.
कांग्रेस उमेदवार प्रवीण पवेकर यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदा जनावरांच्या खरेदी – विक्री प्रमाणे महाराष्ट्रात पक्ष फोडून आमदार खरेदी करण्याचा पराक्रम भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी केला. हे राज्याच्या संस्कृतीला कलंकित करणारे आहे. शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारने राज्यात एकही उद्योगांना आणला नाही तर येणारे उद्योग गुजरातला पाठविल्या गेले. यामुळे राज्यात प्रचंड बेरोजगारी फोपावली आहे. सरकारमधील राज्यकर्ते शासन तिजोरीवर डल्ला मारण्यात मग्न असताना, समाज विकृत नराधमांनी महाराष्ट्रातील आया बहिणी व मुलींच्या अब्रूवर हात घातला. एकीकडे बहिणींना दीड हजार दिल्याचा देखावा व दुसरीकडे खाद्यतेल, विज बिल, व इतर जीवनाचे वस्तूंचे प्रचंड दरवाढ करून लुट सुरू आहे त्यामुळे पुन्हा महाविकास आघाडी चे सरकार हाच राज्यातील जनतेसाठी एकमेव पर्याय आहे असेही ते म्हणाले.
किशोर जोरगेवार दलबदलू धोकेबाज व खोकेबाज?
चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांना कुणीही बोलावले नसताना व ते अगोदरचं महाविकास आघाडी चे घटक असतांना केवळ पन्नास खोक्यांसाठी ते गुवहाटी गेले. आता आमदारकी मिळविण्यासाठी अनेक पक्षांच्या दारी उंबरठे झिजवले. अशा सत्ता तिथे दत्ता कोलांट उडी घेणाऱ्या जनमतचा अनादर करणाऱ्या आमदाराला त्याची जागा दाखवा अशी टीका करून महाविकास आघाडीच्या गरिबीची जाण असणारा एकनिष्ठ व प्रामाणिक उमेदवार प्रवीण पडवेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सभेचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटि अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली, प्रस्ताविक नंदू नागरकर यांनी केले यांनी केले. प्रचार सभेस बहुसंख्येने संख्येने नागरीक उपस्थीत होते.