मनसेच्या जिल्हा बैंक समोर झालेल्या निदर्शने आंदोलनाचे तीव्र पडसाद, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मतदार नाराज.
*चंद्रपूर :-*
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष संतोष रावत व संचालक यांनी बैंकेतील नोकर भरती करतांना शासन निर्णय डावलून मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी एनटी यांचे आरक्षण संपवले व ओपन मधील जागा पैसे घेऊन भरण्याचं कारस्थान चालवलं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नोकर भरती विरोधात जोरदार विरोध करून शासन प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आणि ऐन विधानसभा निवडणूकीच्या आचारसहिंता काळात नोकर भरती बेकायदेशीरपणे सुरु असल्याने ही भरती रद्द करण्याची मागणी केली होती, दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सदर नोकर भरतीला तात्पुरती स्थगिती दिली परंतु या नोकर भरतीत ओबीसी एससी एसटी एनटी प्रवर्गाला आरक्षण द्या अन्यथा यापुढे मनसे कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी इशारा देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या मुख्य शाखा असलेल्या चंद्रपूर येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात व वरोरा येथील बैंकेच्या शाखेसमोर वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले. दरम्यान ओबीसी एससी एसटी एनटी प्रवर्गातील तरुण युवा बेरोजगार यांच्या हक्कावर नोकर भरतीत गदा आणल्याने त्या समाजाची बल्लारपूर कांग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्यावर नाराज आहे त्यामुळे त्यांना या विधानसभा निवडणुकीत जनता धडा शिकविणार का? याबद्दल चर्चा सुरु आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या अध्यक्ष आणि संचालकांनी सरकारचे विधी व न्याय विभागाचे अभिमतांवर बैंकेतील नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण संपवल आहे जे नियमबाह्य आणि तमाम ओबीसी, एससी, एसटी आणि विमुक्त भटक्या जमाती यावर अन्याय करणारे आहे, दरम्यान उच्च न्यायालयात ज्या टिसीएस कंपनीला नोकर भरतीचे काम देण्याचे अभिवचन देण्यात आले ते न पाळता स्वतः निर्णय घेतला व आयटीआय कंपनीसोबत संगनमत करून सगळ्यां जागा लाखों रुपये घेऊन भरण्याचं काम चालवलं त्यामुळे गोरगरीब हुशार मुलांनी स्पर्धा परीक्षाची तयारी केली त्यांना इथे संधी मिळणार नसल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी व नव्याने आरक्षण लागू करून नोकर भरती घेण्यासाठी मनसे कडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखे समोर निदर्शने करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या, यावेळी मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापने, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूरक्याल, शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष मोहित हिवरकर, तालुका उपाध्यक्ष किशोर धोटे, विभाग अध्यक्ष प्रमोद हनवते, उत्तम चिंचोलकर, भदुजी गिरसावळे, बाळू गेडाम प्रतीक मुळे, स्वप्नील देव इत्यादीची उपस्थिती होती.