Home चंद्रपूर खळबळजनक :- अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्यावर हत्तेचा गुन्हा दाखल होणार?

खळबळजनक :- अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्यावर हत्तेचा गुन्हा दाखल होणार?

बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील डॉ.अभिलाषा गावतूरे आल्या अडचणीत.जनतेत व्यक्त होत आहे संताप.

चंद्रपूर :-

समाजसेवेचा दिखावा करून जनसामान्य माणसात आपली प्रतिमा उजळ करणाऱ्या पण दुसरीकडे डॉक्टरी पेशाला कलंकित करून एका निरापराध लहान मुलावर चुकीची ट्रीटमेंट करून जीव घेणाऱ्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कांग्रेस च्या बंडाखोर उमेदवार डॉ अभिलाषा गावतुरे आता एका प्रकरणात अडचणीत आल्या आहे, दरम्यान स्वतःच्या रुग्णालयात लहान मुलावर चुकीच्या ट्रीटमेंटमुळे मुलगा मरण पावल्याने व पोलिसांनी आरोग्य विभागाकडे रुग्णालयातील सिसिटीव्ही फुटेज व इतर दास्तावेज पाठवून अहवाल मागवल्यांनंतर डॉ अभिलाषा गावतूरे यांच्यावर मुलाच्या मृत्युंला जबाबदार पकडून हत्तेचा गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असख्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जनतेत डॉ अभिलाषा गावतुरे यांच्या विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.

मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी विठ्ठल मंदिर वार्डातील श्रीपर्ण रविकिरण मुरकुटे वय 10 वर्ष याला मण्यार नावाचा साप चावला असल्याचे समजताच डॉ अभिलाषा गावतूरे यांच्या चंद्रपूर तेथील रुग्णालयात भरती केले होते, सकाळी मुलाची प्रकृती बरी असतांना त्याला रुंगालयात भरती केल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरु केली त्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली, दरम्यान मुलाच्या आई वडिलांनी डॉ गावतुरे यांना साप डसला असल्याची शक्यता वर्तवली होती, मात्र त्यांनी मुलाला साप डसल्याची कुठेही खून नसल्याने मुलाला काहीही झाले नाही तो बरा होईल असे सांगून डॉ गावतुरे ह्या स्वतःच्या कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला गेल्या, या दरम्यान मुलाची प्रकृती बिघडत असल्याने मुलाच्या वडिलांनी त्यांना बाहेर जाऊन सांगितले की मॅडम मुलाची प्रकृती बिघडत आहे तुम्ही उपचार करा पण तरीही त्या आल्या नाही उलट मुलगा नाटकं करतोय असं सांगून तो लवकर नार्मल होईल असं सांगितलं, काही वेळेत जेंव्हा डॉ गावतुरे आल्या तर मुलाची अवस्था आणखी बघडली होती त्यामुळे त्या घाबरल्या व त्यांनी डॉ वासाडे यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स बोलावली मात्र त्या एम्ब्युलन्स मध्ये मुलाचा आई वडिलांना बसू दिले नाही आणि स्वतः एका नर्स समवेत एम्ब्युलन्स मध्ये बसून डॉ वासाडे यांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती केले.

स्वतःच्या रुंग्णालयात उपचार न करता डॉ वासाडेकडे का नेले?

स्वतःच्या रुग्णालयात उपचार होत नसल्याने डॉ वासाडे यांच्या रुग्णालयात श्रीपर्ण याला भरती केल्यानंतर अगदी अर्ध्या तासात मुलाला मृत घोषित करण्यात आले, त्यावेळी डॉ वासाडे यांना याबद्दल मुलाच्या वडिलांनी विचारणा केली असता मी ट्रीटमेंट केली नाही ती डॉ गावतुरे यांनी केली केवळ त्यांच्याकडे अतिदक्षता विभाग नाही त्यामुळे माझ्या रुग्णालयात भरती केले असे त्यांनी सांगितले, यावरून चुकीच्या ट्रीटमेंट मुळे मुलाचा जीव गेला हे स्पष्ट झाल्याने मुलाच्या वडिलांनी (रविशंकर मुरकुटे) चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनं येथे तक्रार दिली, या तक्रारी वरून पोलिसांनी चौकशी सुरु केली आणि डॉ अभिलाषा गावतुरे यांनी केलेल्या ट्रीटमेंटचे प्रेस्क्रिप्शन, औषध बिल आणि सिसिटीव्ही फुटेज गोळा करून चंद्रपूर मेडिकल कॉलेज चे डीन यांच्या अध्यक्षातेखाली असलेल्या डॉक्टरांच्या पाच सदस्यीय टीम कडून अहवाल मागवला, तो अहवाल आला खरा पण त्या अहवालात डॉक्टरांची निग्लीजन्सी हा प्रमुख मुद्दा आला असला तरी त्यात मृत्युंचे खरे कारण समोर आले नसल्याने पोलिसांनी पुन्हा त्या आरोग्य समिती कडे अहवाल दुरुस्ती करिता परत पाठवला, दरम्यान आता तो अहवाल आला असून मुलाच्या मृत्युंला डॉ अभिलाषा गावतुरे यांची चुकीची ट्रीटमेंट कारणीभूत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती पिडीत मुलाच्या नातेवाईक यांच्याकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here