Home चंद्रपूर शिवाजीनगर येथे शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात.

शिवाजीनगर येथे शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात.

सहायक पोलिस निरीक्षक शेवाळे यांची उपस्थिती!

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपुर शहरात शिवसेनेची स्थापना झाल्यापासून “शिवाजी नगर” (तुकुम) येथे शिवजयंतीचा उत्सव शिवाजीनगर येथील सर्व रहिवासी एकत्र येवून धुमधडाक्यात साजरा करतात. नुकताच दिनांक १२ मार्चच्या तिथीला धरून शिवजयंती उत्सव माजी सभापती अविनाश पुठ्ठेवार, नगरसेवक प्रवीण खनके यांच्या नेत्रुत्वात ह्या उत्सवात रामनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शेवाळे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, या उत्सवात सर्व पक्षीय परिसरातील महिला पुरुष तरूण व बाल गोपाल यांच्या उपस्थित होते. शिवाजी नगर परिसरातून बैंड बाजाच्या तालात मिरवणूक काढण्यात आली. रामनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शेवाळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून प्रतिमेचे पुजन करण्यात येवून कार्यकमाची सुरूवात करण्यात आली. परिसरातील उपस्थितांनी “जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा ह्या घोषणा दिल्या त्यामुळे काही काळ परिसरात नागरीकांनी सुध्दा शिवरायांचे पूजन सुरू केले. शिवरायांचा जयघोशाने परिसर दुमदुमला. उदघाटनात्मक भाषणात शेवाळे यांनी परिसरातील जनतेचे भरभरून कौतुक करून सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व अशीच ऐकता अबाधित राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री. प्रभाकर परकोटवार व माजी नगरसेवक पुरूषोत्तमजी राऊत यांनी सुध्दा जनतेला संबोधीत केले. कार्यक्रमात विशेष रंग चढविला व सर्वाचे लक्ष वेधून घेतले त्या शाळकरी मुलगी कुमारी स्नेहा अविनाश पुट्टेवार हिच्या भाषनांनी, शिवरायांच्या शौर्याबाबत सांगतांना रयतेची काळजी घेणाऱ्या अशा शिवछत्रपतीच्या राज्याची कुठल्याच शासनाशी तुलना करू शकत नाही असे भावयुक्त मनोगत तिनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. महेश कानपेल्लीवार, श्री. सुनिल चिलविरवार (पर्यावरण मित्र) दिनेश सोनवणे, उमेश करपे, मिलिद वझरकर, स्वप्निल पटकोटवार, निखिल पटकोटवार, सौ. उमाळे, सौ. भिसडे, सौ. चिमुरकर, सौ. रंजना टोंगे, सौ.नागिनी करपे, सौ. वृशाली करपे, सौ. अंजली बझरकर, सौ. निता पुट्टेवार, सौ.भाडेकर, सी. जानव्ही मंचलवार, सौ. अर्चना चिलविरवार शिवांशं पुटटेवार, तसेच समस्त शिवाजी नगर वासी उपस्थित होते. तसेच सर्व पसायदान जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी व योगाचे सर्व महिला यांनी सहकार्य केले. सुंदर असे संचालन मोटु सिंग यांनी केले. कार्यकमाची सांगता स्नेह भोजनाने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here