Home Breaking News दुःखद घटना :-महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा  अपघात की  आत्महत्या ? 

दुःखद घटना :-महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा  अपघात की  आत्महत्या ? 

मुख्य अभियंता घुगल यांच्या निधनानंतर चर्चेला उधाण ? 

नागपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील महावितरण कंपनी मधे मुख्य अभियंता म्हणून जवळपास २ वर्ष कार्यरत राहणारे दिलीप घुगल यांची नागपूरच्या परिमंडळा बदली झाली होती मात्र त्यांचा दिनांक 13 मार्च 2020. ला महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असतांना त्यांचा आज (शुक्रवार 13मार्चला)अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती आहे पण हा अपघात आहे की आत्महत्या यांवर चर्चा सुरू असून पोलिस तपासात काय निष्पन्न होते ते काही दिवसांतच कळेल. दिलीप घूगूल हे  53 वर्षाचे होते.
नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आज सकाळच्या सुमारास नागपूर मध्य रेल्वे स्टेशनवर आपल्या नातेवाईकाला घेण्यासाठी गेले होते. अशी माहितीमाहिती आहे,  ते प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जात असतांना त्यांचा अचानक तोल गेला व ते प्लॅटफॉर्म वर कोसळले व या वेळी प्लॅटफॉर्म वरून जाणाऱ्या मालगाडीची त्यांना धडक बसली.या अपघातात अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते मात्र एवढे हुशार आणि नियमांचे पालन करणारे अधिकारी एवढे गाफील राहणार कसे ? हा मोठा प्रश्न असून ही आत्महत्या तर नाही ना ? हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा  आघात आहे .

Previous articleकवी अभिजित ठमके यांना समाजरत्न पुरस्कार !  
Next articleशिवाजीनगर येथे शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here