अरबी समुद्रातील शिवस्मारक बांधून थकले असाल तर राज्यातील महाराजांच्या भग्न अवस्थेत पडलेल्या गडकिल्ल्याची डागडुजी करा.
लक्षवेधी :-
देशात आणि राज्यात 2014 पासून भाजपाचे सरकार आल्यानंतर अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यापैकी मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. याच धर्तीवर 24 डिसेंबर 2016 रोजी एक भव्य-दिव्य कार्यक्रम घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या जल पूजनाच्या कार्यक्रम झाला होता. मात्र यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पुढे काय झाले? हा एक संशोधनाचा विषय ठरत आहे. अद्यापपर्यंत एक वीटही पुढे सरकली नाही. 8 वर्षांपासून या स्मारकाचे काम रखडले आहे. त्यामुळं अरबी समुद्रात शिवस्मारकाचे काय झाले? हा प्रश्न कित्तेक वर्ष अनुत्तरीत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे. हे स्मारक ताजमहालापेक्षाही अधिक लोकप्रिय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे, पण अरबी समुद्रातील शिवस्मारक अजून बांधून झाले नसताना व राज्यातील महाराजांचे गडकिल्ले हेच खऱ्या अर्थाने शिवस्मारक असतांना ते भग्न अवस्थेत आहे पडलेले त्या गडकिल्ल्याची डागडुजी होतांना दिसत नाही मग आग्र्यात शिवस्मारक कशासाठी? हा गंभीर प्रश्न आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे. हे स्मारक ताजमहालापेक्षाही अधिक लोकप्रिय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकार या स्मारकासाठी जमीन संपादन करेल आणि स्मारक उभारेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्राप्रमाणेच आग्र्यातही पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आग्र्यात शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधण्याची घोषणा केली. हे स्मारक अत्यंत भव्यदिव्य असेल. इतकं की ताजमहलपेक्षाही अधिक लोक शिवाजी महाराजांचं स्मारक पाहायला येतील एवढं भव्य स्मारक आग्र्यात बांधण्यात येईल, अशी घोषणाच फडणवीस यांनी केली.
आग्र्यात कशाला हवंय शिवस्मारक?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. मात्र या किल्ल्याच्या संवर्धणासाठी सरकार कडे पैसा नाही, काही किल्ले अतिशय भग्न अवस्थेत अखेरचा श्वास घेत आहे तर काही किल्ले प्रेमाचे चाळे करणाऱ्यांना वरदान ठरत आहे, शिवछत्रपतींचा गडकिल्ल्याच्या माध्यमातून हा ऐतेहासिक ठेवा आपण जपत नाही आहो आणि शिवछत्रपतींच्या नावाने उगाच नवं काहीतरी करण्याच्या फुशारक्या ठोकायच्या आणि आग्र्यात मुस्लिम विरुद्ध हिंदू अशी धार्मिक पुष्टी जोडायची हा केवळ नादानपणाच म्हणावा लागेल.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका सरकार कधी समजून घेणार?
राज्याच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकही आमदार खासदार नसेल पण त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्य साधारण महत्व आहे, ते जे बोलतात आणि मुद्दे मांडतात त्यात महाराष्ट्राचं हित जोपसल्या जातंय, पण बाकीच्या राजकारण्या सारखा त्यांचा स्वभाव नाही, साम दाम दंड भेद वापरून सत्ता हस्तगत करण्यात त्यांना रस नाही, कारण त्यांचा स्वाभिमान त्यांनी कुणाकडे गहाण ठेवला नाही, त्यांनी अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकांसंदर्भात स्पष्ट म्हटलं होतं की हे शिवस्मारक बांधण सोपं नाही आणि होऊच शकत नाही, जर सरकार ला वाटतं असेल की महाराजांचे स्मारक उभारायचे आहे तर आधी महाराजांचे भग्न अवस्थेत असणारे गडकिल्ले दुरुस्त करा तेच आमच्या शिवछत्रपतीचे खरे स्मारक आहे, जर शिवछत्रपतींचा इतिहास बघितला जाईल तेंव्हा तुम्ही उभारलेले स्मारक बघितल्या जाणारं नाही तर महाराजांनी बांधलेले गडकिल्ले तेच खऱ्या अर्थाने इतिहासाची साक्ष देईल की आमचा राजा असा पराक्रमी होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेहमी येतात व प्रसारामाध्यमाना ते भेटी नंतर सांगतात की आमचे ते मित्र आहे आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचं व्हिजन आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी काही नवं करण्याचा त्यांचा विचार घेण्यासाठी आपण त्यांची सदिच्छा भेट घेतली, पण जे राज ठाकरे गेली कित्तेक वर्ष या महाराष्ट्रातील सरकारला सांगत आहे की बाबांनो महाराजांचे गडकिल्ले आधी दुरुस्त करा कारण तोच महाराजांचा खरा ऐतेहासिक ठेवा आहे, पण राज्यकर्ते त्याकडे डोळेझाक करतात आणि नको तिथे व जे अशक्य आहे तिथे शिवस्मारक बांधण्याचा अट्टाहास करतात ते राज्यातील जनतेला एक भुलथाप असतें ते आता स्पष्ट झालं आहे,