मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सिडीसीसी बैंकेचे सिइओ कल्याणकरची चौकशी अधिकारी सारडा यांच्याकडे दांडी?
चंद्रपूर :-
सिडीसीसी बैंकेच्या 360 पदांच्या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून ज्यांनी पैसे दिले त्यांनाच नोकरीं ही पद्धत अवलंबून सर्वसामान्य मागासवर्गीय होतकरू हुशार विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक डावलून जो खेळ बैंकेचे सिइओ कल्याणकर, अध्यक्ष संतोष रावत, उपाध्यक्ष व इतर संचालक यांनी खेळला खरा पण आरक्षण बचाव संघर्ष समितीचे समन्वयक राजू कुकडे व इतर सदस्यांनी शासन प्रशासनाकडे व मुंबई उच्चं न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जी आरक्षण संदर्भात याचिका दाखल केली व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून बैंकेच्या नोकर भरतीची एसआयटी चौकशी लावली त्यामुळे बैंकेचे सिइओ हे धास्तावले आहे, दरम्यान सिइओ कल्याणकर यांना चौकशी अधिकारी सारडा हे वेळोवेळी संपूर्ण दास्तावेज घेऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बोलावत असतांना सुद्धा ते चौकशी करिता दांडी मारत असल्याने चौकशी अधिकारी सारडा हे विभागीय सहनिबंधक वानखेडे यांच्याकडे कल्याणकर यांची तक्रार करून आपल्या स्थरावर त्यांच्या विरोधात कारवाई करावी असे पत्र देणारं आहे, दरम्यान या गंभीर प्रकरणी वानखेडे काय कार्यवाही करतात यावर सर्व अवलंबुन असल्याचे दिसत आहे.
आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सुरुवाती पासून ते आतापर्यंत शासन प्रशासनाकडे नियमित पाठपुरावा सुरु आहे, चंद्रपूर ला राज्याचे राज्यपाल आले असतांना त्यांना समिती तर्फे निवेदन देण्यात आले होते, राज्याचे मुख्य सचिव यांना मंत्रालयात निवेदन देण्यात आले होते तर राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदने दिली व त्यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आंदोलनकर्ते समितीचे सदस्य यांना सिडीसीसी बैंकेच्या बेकायदेशीर नोकर भरतीच्या चौकशीचे आदेश देत असल्याचे सांगून आमरण उपोषण मागे घेण्याचे कळवले होते, एवढेच नव्हे तर खुद्द त्यांनी उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांना भ्रमणध्वनी वरून संवाद साधत आपण बैंकेच्या अनियमितता व भ्रष्टाचार याविषयी सखोल चौकशी करू असे ठोस आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते, परंतु त्यानंतर स्थानिक जिल्हा उपनिबंधक सारडा यांना बैंकेच्या नोकर भरतीची प्राथमिक चौकशी करण्यासाठी जबाबदारी दिली असता त्यांना बैंकेचे सिइओ कल्याणकर हे दाद देत नसून चौकशी पासून ते पळ काढत आहे.
पुन्हा आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे आंदोलन होणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर बैंकेचे सिइओ कल्याणकर हे चौकशीला सामोरे जातं नसल्याने चौकशी थंड बस्त्यात असल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती सदस्य आता वेगळ्या आंदोलनाची तयारी करत असून येणाऱ्या राज्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अभिनव आंदोलन होणार असल्याची माहिती आहे, हजारो मागासवर्गीय हुशार विद्यार्थी तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या बैंकेच्या भ्रष्ट अधिकारी पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने लवकरच आंदोलनाची घोषणा होणार असल्याचे कळते.