खाजगी ट्रान्सपोर्ट, बाहेरील प्रांतातील वाहनांची एंट्री फी, सिमा नाक्यावर वसुली आणि RTO कार्यालयात सर्वच कामाचे कमिशन मिळून 8 कोटीच्या वर माया चा RTO चा बाजार.
RTO चा पंचनामा भाग -3
प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्या आदेशाने खाजगी ट्रान्सपोर्ट, बाहेरील प्रांतातील वाहनांची एंट्री फी, सिमा नाक्यावर वसुली आणि RTO कार्यालयात सर्वच कामाचे कमिशन मिळून 8 कोटीच्या वरची माया गोळा करण्याचे काम ज्या खाजगी एजंट कडे आहे, ते एजंट सुद्धा आता कोट्याधीश झाले असून त्यांच्या प्रापर्ट्या बघितल्या तर सर्वसामान्य माणूस चक्रावून जाईल एवढी भयंकर स्थिती सध्या दिसत आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी एसीबी च्या मुंबई येथील महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार असल्याने व मुंबई येथील परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना सुद्धा तक्रार देणारं असल्याने RTO कार्यालयातील बाजार लवकरच उठणार असल्याचे बोलल्या जातं आहे.
चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आंनद मेश्राम यांच्या भ्रष्टाचाराच्या चूरस कथा सध्या पत्रकारांच्या रडारवर असून दररोज एक एक खुलासे होतं आहे, लक्कडकोट सिमा नाक्यावर सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एक खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात 500 रुपयाची लाच घेतांना अडकल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार व उमाशंकर तिवारी यांनी एसीबी चे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्यासह स्थानिक एसीबी च्या पोलीस उपअधिक्षिका मंजुषा भोसले यांच्याकडे तक्रार करून मुख्य आरोपी म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आंनद मेश्राम यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार RTO एजंट म्हणून जे काम करताहेत त्यांची संपत्ती पण कोट्यावधीच्या घरात असून त्यापैकी अनेकांनी विविध ठिकाणी गुंतवणूक केली आहे, महत्वाची बाब म्हणजे स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणारे आंनद मेश्राम यांच्यासोबत अतुल नामक एका एजंटची संयुक्त प्रापर्टी सुद्धा समोर आली असल्याने आता RTO चे कोट्याधीश झालेले एजंट सुद्धा पत्रकारांच्या रडारवर आले आहे.
कोण आहेत हा कोट्याधीश एजंट अतुल? आणि इतर एजंट?
RTO कार्यालयात खाजगी काम करणाऱ्या एजंट ची संख्या 50 च्या घरात असून काही दिवसापूर्वी अतुल नामक एजंट च्या रिसॉर्ट मध्ये एका RTO अधिकाऱ्यांनी सर्व एजंट ना पार्टी दिल्याची माहिती समोर आली होती, मात्र काही एजंट पार्टीतून सुटले होते त्यांनी दुसऱ्या दिवशी आरटीओ कार्यालयात धिंगाणा घातला होता त्यामुळे त्या पार्टीची चर्चा झाली, या रिसॉर्ट चा मालक अतुल हा मागील 25 वर्षापासून एजंट म्हणून RTO कार्यालयात काम करीत आहे, या अतुलची संपत्ती आता कोट्यावधीच्या घरात असून त्यांनी बिलियंट अकॅडमी कॉन्व्हेंट सुद्धा उभारले आहे. त्यांचे दहा कोटीची लागत असलेले राजवाडा हॉटेल सुद्धा आहे. इतकेच काय तर अकोला येथील ओम भवन सभागृह सुद्धा यांचेच असल्याची चर्चा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात मुख्य रस्त्यावर शेतीचा तो संयुक्त मालक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा पर्यटन क्षेत्र असलेल्या मोहर्ली येथे यांची जागा आहे. यात काही वरिष्ठ अधिकारी सोबतीला असून दोन प्लाँट, घर आणि 20000 स्क्वेअर फुट मध्ये मोठ्या थाटात जागेचा सौदा झाल्याची चर्चा सुद्धा आहे. दरम्यान जो व्यक्ती आरटीओ कार्यालयाच्या परिसरात मागील 25 वर्षापासून लर्निंग, परमनंट, साधे फार्म भरण्याचे काम करतो तो जर कोट्याधीश असेल तर मग त्यांच्या वसुलीतून येणाऱ्या पैशाचा वाटा ज्या अधिकाऱ्यांना मिळतो तो अधिकारी किती कमावत असेल हे यावरून दिसत आहे, दरम्यान यापुढे मोरेश्वर शेंडे, अरुण टोगे, रवी निवलकर, संजय नगराळे, राहुल नगराळे, देवा गोंगले, दिपक खाडीलकर, रमेश नळे, मनोज घडसे, गणवीर, कुणाल नगराळे, नौशाद, पंकज, पंपी, नदीम यासंह सर्वच RTO एजंट सह अधिकारी यांची पोलमखोल “RTO चा पंचनामा” या सदरात प्रकाशित होणार आहे.