Home चंद्रपूर संतापजनक :- RTO किरण मोरेचा विश्वासू वाहन निरीक्षक पवार एसीबी च्या जाळ्यातून...

संतापजनक :- RTO किरण मोरेचा विश्वासू वाहन निरीक्षक पवार एसीबी च्या जाळ्यातून निसटला?

RTO च्या तेलंगना सिमा नाक्यावर शिवाजी विभुतेला अटक मग वाहन निरीक्षक गोविंद पवार ला कां नाही?

RTO चा पंचनामा भाग -4

प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून चंद्रपूर गडचिरोली चा पदभार सांभाळणारे किरण मोरे यांच्या भ्रष्टाचाराचे कारणामे जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट कंपन्याच्या मालकांना एखाद्या सुई टोचल्या सारख्या वेदना देत असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर बसलेले आंनद मेश्राम नारद मुनीच्या भूमिकेत त्या वेदनेवर मीठ चोळत असल्याचा प्रकार करत आहे. दरम्यान यांच्या पापाचे बिंग लक्कडकोटच्या तेलंगना सिमा नाक्यावर शिवाजी विभुते यांना एसीबी च्या पथकाने अटक केल्यानंतर फुटले खरे पण या दोघांचा विश्वासू असणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक गोविंद पवार मात्र एसीबी च्या तावडीतून कसे निसटले याचा शोध अजूनही लागला नाही, पण प्रत्यक्षदर्शी ने गोविंद पवार त्या सिमा नाक्यावर होते अशी माहिती दिली आहे. दरम्यान अमरावती च्या एसीबी पथकाने दोघांनाचं अटक केली पण त्यावेळी त्या सिमा नाक्यावर पुन्हा काही एजंट रात्रीच्या पाळीत ड्युटीवर होते अशी सुद्धा माहिती आहे, एकूणच एसीबी च्या पथकांना भ्रष्टाचारी RTO अधिकारी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांनी हुलकावणी देत मोटर वाहन निरीक्षक गोविंद पवार यांना वाचविण्यात यश मिळवलं अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रपूरसह राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाचा दर्जा वाढवून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)मध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांची कामे चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिनस्त होतं आहे व त्याचा प्रभारी कारभार किरण मोरे सांभाळत असून त्यांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून बदली झाली असतांना ते इथेच मुख्यालयी बसत आहे, जोपर्यंत प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कुणी नियमित रुजू होतं नाही तोपर्यंत या दोन्ही कार्यालयाच्या अधीनस्त भ्रष्टाचारातून किरण मोरे यांचे मालसुतो अभियान सुरु आहे.खरं तर किरण मोरे यांच्या आदेशानेच लक्कडकोट या RTO च्या तेलंगना सिमा नाक्यावर अवैध वसुली होतं असतांना जर त्यात शिवाजी विभुते यांना एसीबी ने अटक केली तर किरण मोरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून आनंद मेश्राम यांना एसीबीने अटक करायला हवी, पण या दोघांना अटक तर झाली नाहीच उलट शिवाजी विभुते यांना जामीन मिळाला आणि मोटर वाहन निरीक्षक गोविंद पवार यांना पळविण्यात आले त्यामुळे आता या गंभीर प्रकरणी एसीबी ची चंद्रपूर टीम काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here