Home चंद्रपूर संतापजनक :- RTO च्या भ्रष्टाचार विरोधात तक्रार करणाऱ्यांची पोलिसात तक्रार का होतेय?

संतापजनक :- RTO च्या भ्रष्टाचार विरोधात तक्रार करणाऱ्यांची पोलिसात तक्रार का होतेय?

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे व मेश्राम यांनी अवैध वसुली करायची आणि ती समोर आणणारे पोलीस कार्यवाहीत बळी पाडायचे ही खेळी संतापजनक.

RTO चा पंचनामा भाग -6

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची चंद्रपूर येथील कारकीर्द संपली असतांना त्यांची गडचिरोली येथे त्याचं पदावर बदली झाली खरी, पण चंद्रपूर गडचिरोली हे दोन जिल्हे मिळून जे प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथे झाल्याने त्याचा अतिरिक्त पदभार किरण मोरे यांना मिळाल्याने त्यांची जणू चांदी झाली आणि दोन्ही जिल्ह्याच्या कारभाराची भ्रष्ट मार्गने येणारी माया त्यांच्या तिजोरीत भर टाकणारी ठरली, खरं तर मोरे यांचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून जो कार्यकाळ चंद्रपूर मध्ये राहिला, त्यात त्यांनी आपल्या भ्रष्ट मार्गाने चाललेल्या व्यवहाराला दाबण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या किंव्हा पत्रकारांनी त्याबाबत बातम्या लिहिल्या त्यांनाच पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी देऊन फसवल्या गेले असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.

किरण मोरे यांनी नेहमीच प्रसारमाध्यमासमोर आपली पारदर्शक छबी उजागार करून आतमधला भ्रष्टाचारी लपवला आहे, मात्र ज्यांनी ज्यांनी त्यांच्यातील भ्रष्टाचारी चेहरा उजागार केला त्या सामाजिक राजकीय व पत्रकारांना त्यांनी पोलिसात खोटी तक्रार देऊन संपवले असल्याच्या पण घटना घडल्या आहे. त्यात अशोक मत्ते हे पहिले टार्गेट होते, चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाला अशोक मत्ते त्रास द्यायचा. मत्ते हा मोठे नेते-पत्रकार यांच्या नावाने फोन करत वाहन निरीक्षकाकडूनन सातत्याने मोठ्या रक्कमेची मागणी करायचा. त्याच्या या मागण्यांना अधिकारी कंटाळले म्हणून RTO तर्फे त्यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये तक्रार देण्यात आली, पण खरी गोस्ट ही आहे की अशोक मत्ते हे अनेक वर्ष RTO कार्यालयात मोठे काम करायचा पण त्यांनी त्यांची डिमांड वाढवली म्हणून त्यांचेवर 40 हजाराची खंडणी मागितली म्हणून गुन्हे दाखल करायला लावले, जानेवारी 2021 ला अशोक मत्ते यांच्यावर खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी चे तत्कालीन शहर सचिव नयन साखरे यांना 35 हजार रुपयाची खंडणी प्रकरणी अटक करायला लावली, राष्ट्रवादी चे तत्कालीन शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांच्या विरोधात सुद्धा खंडणी प्रकरणी तक्रार केली होती मात्र त्यात गुन्हे दाखल झाले नव्हते, एका पत्रकाराला पण यांनी असंच फसवलं, म्हणजे जो कुणी RTO कार्यालयातील भोंगळ कारभार व भ्रष्टाचार बाहेर आणेल त्यांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हे दाखल कारण्याचं छडयंत्र करायचा उपक्रम हा किरण मोरे आनंद मेश्राम यांचा राहिला आहे जणू ते किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या भ्रष्टाचाराचे बळी ठरले आहे, भ्रष्टाचार यांनी करायचा आणि त्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांना बळी चढवायचे हा असल्या संतापजनक प्रकार वरील दोन्ही RTO अधिकारी करताहेत हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा ऑफर देऊन फसवणूक कारण्याचं छडयंत्र सुद्धा ते करताहेत हे सुद्धा समोर आलं आहे.

किरण मोरे आणि आंनद मेश्राम वर लवकरच कारवाई होणार?

सर्वसामान्य जनतेच्या वाहनांना चालन मारून व एंट्री फी च्या नावाने अवैध मार्गाने वसुली करून दरमहा जवळपास 8 कोटीची जबरण वसुली करणारे मोरे व मेश्राम हे स्थानिक लोकप्रतिनिधी, मोठे पत्रकार ते वरिष्ठ स्तरावर मंत्र्यापर्यंत हवाला मार्फत प्रसाद रुपी भोग अर्पण करतात यामुळे आपलं कुणी काही बिघडवू शकत नाही, हा जो यांना घमंड आला आहे त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपाय करत असून लवकरच मोरे व मेश्राम यांच्या काळ्या करणाम्याची जाहीरपणे चिरफाड होणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही क्षणी कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here