Home चंद्रपूर जिल्ह्यात दारू पुरवठा करणारे दारू माफिया बंडू आंबटकर व दगडी यांची पोलिसांशी...

जिल्ह्यात दारू पुरवठा करणारे दारू माफिया बंडू आंबटकर व दगडी यांची पोलिसांशी साठगांठ ?

दररोज लाखों रुपयाची दारू चंद्रपूरात, दारूबंदीचा फज्जा !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

सद्ध्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठणार असल्याचे संकेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले असले तरी मागील पाच वर्षांपासून अवैधरित्या चोरट्या मार्गाने व पोलिसांशी साठगांठ करून चंद्रपूर जिल्ह्यात दारू मोठ्या प्रमाणात विकल्या गेली हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक पोलिसांशी साठगांठ करून दररोज लाखों रुपयाची दारू वाहतूक करणारे समुद्रपुर जिल्हा वर्धा येथील बंडू आंबटकर व टोपण नावाने ओळखल्या जाणारे घूग्गूस येथील दगडी यांची दररोज लाखों रुपयाची दारू चंद्रपूर जिल्ह्यात पुरवठा होतं आहे, या खेळात पोलिस प्रशासन पूर्ण मदत करीत असून लाखों रुपये महिन्याकाठी पोलिसांना हप्ता येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे, याबाबत सुद्धा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी समीक्षा करावी अशी मागणी होतं आहे.
आता दारूबंदी उठणार असे संकेत असतांना खरं तर ज्या तत्कालीन अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी करून चंद्रपूर जिल्ह्यातील रोजगारावर आणि आर्थिक व्यवस्थेवर जो आघात केला त्याची भरपाई आता दारूबंदी उठवल्यावर किती काळात होईल याबद्दल जनतेत चिंतेचे सावट आहे, मात्र जर दारूबंदी उठलिच नाही तर काय होईल ? ह्या प्रश्नाला घेवून सुद्धा अनेक युवा बेरोजगार चिंतेत आहे.
दारूबंदी उठवायला विद्यमान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेत्रुत्वात शासकीय समीक्षा समिति नेमून जिल्ह्यातील सामाजिक संस्था, धार्मिक आणि राजकीय संघटना व इतर लोकांचे दारूबंदी बाबत मत व आक्षेप जाणून घेतले होते व जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी दारूबंदी उठवण्याबाबत आपले मत व्यक्त केले होते व हा अहवाल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिनांक १६ मार्चला सोपविण्यात आला, हा अहवाल आल्यानंतर पत्रकारांनी जेंव्हा पालकमंत्र्यांना दारूबंदी उठवणार कां ? याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या अशा पल्लवित झाल्या. मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करून ज्या प्रकारे पोलिसांनी आणि दारू माफियांनी जो अमाप पैसा कमावला त्याचे काय ? कां होतं नाही बंडू आंबटकर आणि दगडीवर कारवाई ? हे प्रश्न मात्र अनुत्तरीत राहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here