Home चंद्रपूर “RESOXY” ह्या कोचिंग क्लासेसच्या सलीम खानने आशिष रामटेके यांना दिली धमकी ! 

“RESOXY” ह्या कोचिंग क्लासेसच्या सलीम खानने आशिष रामटेके यांना दिली धमकी ! 

दुसऱ्यां इन्स्टिट्यूटचे निकाल स्वतःच्या नावे दाखवून केली विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक! जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार ! लवकरच होणार गुन्हा दाखल ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

ड्रिम केअर एज्युकेशन प्रा.लि.चे संचालक आशिष योगराज रामटेके,यांनी उत्तर प्रदेश येथून आलेल्या सलीम खान गफ्फार खान या व्यक्तीसोबत भागीदारी करून ऑक्सिजन फॉर ड्रीम नावाने एक कोचिंग काढून सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात इयत्ता ११ वी, १२ वी सोबत IIT-JEE/NEET ची तयारी करुन देण्यासाठी तुकडोजी भवन सिविल लाईन नागपूर रोड चंद्रपूर येथे क्लासेस सुरु केलेत.त्यावेळी इन्स्टिट्यूटला चांगला फायदा झाला व यामधील हिस्सेदारीचा पैसा आशिष रामटेके यांनी गुंतवला तो मिळून आशिष रामटेके यांना ३२ लाख रुपये वाट्याला येणार होते. मात्र इन्स्टिट्यूटचे सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेवून सलीम खान यांनी आशिष रामटेके यांनी ऑक्सिजन फॉर ड्रीमला उभारण्यात पूर्ण वेळ दिला व अथक परिश्रम घेत रक्ताचे पाणी करुन या इन्स्टिट्यूटचा पाया मजबूत केला पण त्याचं आशिष रामटेके यांच्या वडिलांचे निधन झाले असता यादरम्यान सलिम खान यांनी त्यांना ऑक्सिजन फॉर डिम मधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि भागीदारी जवळपास ३२ लाख रुपये असतांना शेवटी २५,०००००/- रुपये हे आशिष रामटेके यांना देण्याचे ठरले त्यावेळी रवींद्र दारवटकर हे भागीदार सुद्धा त्यावेळी उपस्थित होते. व रवींद्र दारवटकर यांच्यासमोर हे पैसे देण्याबाबत आशिष रामटेके यांना देण्याचे कबूल केले, व नंतर त्यांना ५५०.०००/- टप्प्याटप्प्याने देण्यात आले, 
मात्र आता उर्वरित जवळपास २० लाख रुपयाची रक्कम सलीम खान देण्यास टाळाटाळ करीत असून त्यांना पैसे मागण्यांसाठी त्यांच्या इन्स्टिट्यूटमधे गेले असता तूला यानंतर पैसे मिळणार नाही, तुला जिथे जायच आहे तिथे जा, मला काही फरक पडत नाही आणि जर जास्तच त्रास देशील तर मी एका गुंड्याला दोन लाखांची सुपारी देईन तूला २०लाख रुपये देण्यात काय फायदा ? असे म्हणून त्यांनी आशिष रामटेके यांना प्रत्यक्ष जीवे मारण्याची धमकीच दिली आहे .आशिष रामटेके हे आजही ‘ऑक्सिजन फॉर ड्रिम’ या कंपनीमध्ये भागीदार आहेत पण सलीम खान यांनी त्या इन्स्टिट्यूटमधे भागीदार असलेल्या रवींद्र दारवटकर यांना सुद्धा त्या इन्स्टिट्यूटमधून बाहेर करून त्यांचे भागीदारीत मिळणारे जवळपास २ लाख ५० हजार रुपये परत केले नाही व सलीम खान यांनी चार नविन भागीदारांना सोबत घेवून रेझॉक्सि नावाने नविन कालासेस सुरु केले आहेत. जे बोगस निकाल दाखवून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करीत आहे. कारण रेझाक्शी या क्लासेसची निर्मीती जर २०१९ मध्ये झाली तर त्यांचे निकाल हे २०२१ मध्ये येतील.
पण जर यांचे माहितीपत्रक बधितले तर हे लक्षात येईल की यांनी दाखविलेले निकाल हे पूर्णपणे खोटे आहेत त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची माहितीपत्रकामध्ये ऑक्सिजन क्लासेसचे विद्यार्थी, Wisdom क्लासेस अमृतसर, यांचे विद्यार्थी Resonance क्लासेसचे विद्यार्थी दाखवून फसवणूक करीत आहे. कोणताही विद्यार्थी IT किंवा M.B.B.S. ला लागतो तेव्हा त्यामध्ये तिन
विषया (PCM/PCB) मध्ये उत्कृष्ट गुण घ्यावे लागतात केवळ एकाच विषयात चांगले गुण घेवून चालत नाही, एखाद्या क्लासेसचे येणारे उत्कृष्ट निकाल ही त्या क्लासेसची संपत्ती असून त्याचा गैरवापर Resoxy करीत आहे.व आशिष रामटेके यांना मूळ ऑक्सिजन फॉर ड्रीम मधून बेकायदेशीरपणे बाहेर करून त्यांना व रवींद्र दारवटकर यांचे पैसे परत न देता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने सलीम खान यांचेवर तातडीने चौकशी करून कारवाई करावी व आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. या सोबतच आशिष रामटेके यांनी शिक्षण महासंचालक, पुणे, शिक्षण उपसंचालक, नागपूर, शिक्षण अधिकारी, जि.प. चंद्रपूर आयुक्त , आयकर विभाग नागपूर
राजू कुकडे सामाजिक कार्यकर्ते तथा मनसे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर.यांना सुद्धा तक्रार करून रेझाक्शीच्या सलीम खान यांचेवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Previous articleजिल्ह्यात दारू पुरवठा करणारे दारू माफिया बंडू आंबटकर व दगडी यांची पोलिसांशी साठगांठ ?
Next articleग्राहक पंचायत महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here