आमदार किशोर जोरगेवार यांची RTO किरण मोरेच्या हकालपट्टीची विधिमंडळात मागणी, परिवहन मंत्र्याने हकालपट्टीची दिली ग्वाही.
मनसे वाहतूक सेनेच्या पाठपुराव्याने भ्रष्टाचारी किरण मोरेच्या भ्रष्ट कारभाराचा अखेर अंत, आता आनंद मेश्राम रडारवर.
लक्षवेधक :-
चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आपल्या भ्रष्ट नितीचा अवलंब करत एंट्री फी च्या नावावर कोट्यावधी ची अवैध वसुली करणारे, केंद्र शासनाने बंद केलेल्या तेलंगना सिमा नाक्यावर बेकायदेशीर वसुली करून भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड तोडणारे किरण मोरे हे RTO कार्यालयात मात्र जणू एखाद्या निष्कलंक प्रशासकासारखे वागायचे, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे कुटील हावभाव जो कुणी समजला तो मात्र किरण मोरे किती नितिभ्रष्ट आणि कावेबाज आहें हे ओळखून त्यांना त्याची जाणीव करून द्यायचे, पण भ्रष्ट मार्गाने येणारा पैशाचा माज अंगात हरामखोरी आणतो, घमंड आणि अक्कड आणतो तसा मोरे हा अधिकारी कायम अकडत होता आणि माल सुतो अभियान चालवून स्वतःच्या तुंबड्या भरत होता, यांच्या ह्या भ्रष्ट नितीचा अंत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने त्यांच्या सर्वच भ्रष्ट अड्डयाची तक्रार वरिष्ठाकडे करून कारवाई करण्याची मागणी केली, दररोज लाखों रुपयाची अवैध वसुली तेलंगना सिमा नाक्यावर होत आहें तो सिमा नाका बंद करण्यात यावा अशी पण मागणी मनसे वाहतूक सेनेने लावून धरली,
दरम्यान काही दिवसापूर्वी त्याचं सिमा नाक्यावर RTO च्या सहाय्यक निरीक्षकाला 500 रुपयाची लाच घेतांना अमरावती एसीबी पथकाने रंगेहात अटक केल्यानंतर RTO किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांना या प्रकरणी मुख्य आरोपी करून अटक करावी अशी मागणी मनसे वाहतूक सेनेने पुन्हा लावून धरली, दरम्यान या प्रकरणाची RTO चा पंचनामा ही मालिका भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर सुरु झाली, या मालिकेच्या 10 व्या एपिसोड ने RTO चे भ्रष्ट शिहासन हलले आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करून RTO किरण मोरे यांचे प्रताप सांगितले, त्यांना त्वरित त्या पदावरून हटवा अशी मागणी केली, दरम्यान राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोरे यांना हटविण्याची ग्वाही दिली त्यामुळे मोरे यांची हकालपट्टी होणार हे निश्चित झाले असून RTO किरण मोरेची विकेट घेऊन भूमिपुत्राची हाक ने RTO पंचनाम्याची मालिका जिंकली असे म्हटले तर वावगे ठरू नये अशी स्थिती आहें.
प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदभार सांभाळणारे किरण मोरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचे सूत्र सांभाळणारे आनंद मेश्राम या जोडगोळीने भ्रष्टचाराच्या सर्व सिमा ओलांडून सर्वसामान्य वाहन चालक मालक यांचे आर्थिक शोषण चालवले होते, मोठं मोठे ट्रान्सपोर्ट, गाड्यांच्या शोरूम कार्यालयात पायघड्या घालायच्या आणि एंट्री फी च्या नावाखाली हप्ता वसुली ची ओवाळणी घायची, शिवाय बंद करण्यात आलेल्या सिमा नाक्यावर जबरण वसुली करायची हा नित्यक्रम RTO किरण मोरे आणि आंनद मेश्राम यांनी चालवला होता, त्यांच्या या कारणम्याची मालिकाच भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर प्रकाशित करून त्यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्यात येत होते,
दरम्यान या मालिकेच्या 10 व्या RTO पंचनाम्यात एका मृत गाडी मालकाला जिवंत दाखवून वाहनाची रजिस्ट्री करण्यात आल्याचा सनसनीखेज खुलासा करण्यात आल्याने RTO कार्यालयात खळबळ उडाली होती व हा मुद्दा आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्षवेधी च्या माध्यमातून विधिमंडळात मांडला आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत RTO किरण मोरे यांची उचलबांगडी करण्याचे संकेत दिले, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला आलेले हे यश असून भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या माध्यमातून जी RTO चा पंचनामा ही मालिका सुरु केली होती त्यामुळे मोरे यांची खरी माहिती जनतेसमोर आली आणि आता त्यांची त्यामुळे उचलबांगडी झाली.