Home महाराष्ट्र राजकीय कट्टा :- राजसाहेब ठाकरे यांच्या नव्या पक्ष रचनेची राज्यातील सर्व महाराष्ट्र...

राजकीय कट्टा :- राजसाहेब ठाकरे यांच्या नव्या पक्ष रचनेची राज्यातील सर्व महाराष्ट्र सैनिकांना उत्सुकता?

पदाधिकारी नेमताना त्यांची सामाजिक बांधिलकी आणि त्यांचं शिक्षण व पक्षाप्रती समर्पण तेवढं तपासलं गेल्यास पक्ष घेणार भरारी.

राजकीय कट्टा :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा असा राजकीय पक्ष आहें की महाराष्ट्रात ज्यांचा एकही खासदार, आमदार नाही तरी राज्यातील राजकीय घडामोडीत मनसेला डावलून कुठलीही बातमी पूर्ण होत नाही, त्यातच राज्यातील कुठंलाही प्रश्न असेल व तो जर सोडविल्या जातं नसेल तर मुंबई च्या शिवतीर्थावर राजसाहेब ठाकरे यांच्या दरबारी तो प्रश्न येतो आणि आणि तो लिलया सोडविल्या जातो, म्हणजेच कुठलीही सत्ता नसताना केवळ राज ठाकरे नावाचा ब्रॉन्ड हा महाराष्ट्रातील जनतेसाठी न्याय देण्यास निर्णायक ठरतो हा इतिहास नाही तर वर्तमान आहें आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता जरी महाराष्ट्रात नसली तरी सामाजिक सांस्कृतिक दृष्टया मनसेला डावलून कुठलीही बातमी बनत नाही, ही राजसाहेब ठाकरे यांनी मिळवलेली फार मोठी उपलब्धी आहें. पण या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात का येत नाही? याची कारणमिमांसा केली तर त्याची अनेक कारणे आहेत, त्यात महत्वाची जिल्हास्तरावर पदे देतांना मुंबई मधून किंव्हा इतर ठिकाणाहून आलेले मोठे पदाधिकारी हे जिल्ह्यातील पदे देण्याची शिफारस राजसाहेब ठाकरे यांचेकडे करतांना त्या पदाधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी आणि त्यांचं शिक्षण तपासत नाही तर चमकोगिरी करणारे व पुढे पुढे करून आपली हवा निर्माण करणारे कार्यकर्ते यांची राजसाहेब ठाकरे यांच्याकडे शिफारस करतात आणि मग असे पदाधिकारी पक्ष वाढविण्यापेक्षा स्वतःला मोठं करतात आणि मग निवडनुका मध्ये पक्षाला उमेदवार मिळतं नाही, महत्वाची बाब म्हणजे अनेक जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय औद्योगिक आणि भौगोलिक इतिहास माहीत नाही, जिल्ह्यात किती जिल्हा परिषद सदस्य किती पंचायत समिती सदस्य याचं सुद्धा ज्ञान ही वस्तुस्थिती राजसाहेब ठाकरे यांनी समजून घ्यावी ही महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहें.

खरं तर मनसे पक्षाची राजकीय वाटचाल ही खडतर जरी असली तरी ती एका विशिष्ट वेळी निर्णायक ठरणारी आहें, कारण ज्या अवस्थेत आज महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहें त्या ठिकाणी शिवसेना पक्षाची तुलना केली तर मनसे हा पक्ष त्या तुलनेत आजही प्रभावी आहें, मनसेचे अस्तित्वच संपले आहे. यानंतर मनसे हा पक्षच नगण्य असेल. त्याची दखलही घेतली जाणार नाही असे म्हणणारा राजकारणातला मोठा गट आहे. पण इतिहासात डोकावून पाहिले असता, इतिहास हा मनसेच्या बाजूने आहे. त्यामुळे जर हा काळ मनसेसाठी वाईट असला तरी तो सदासर्वदा असणार नाही, हे इतिहास पाहिल्यानंतर लक्षात येते.

शिवसेनेप्रमाणे मनसेला पण संधी मिळेल.

शिवसेनेची ८० च्या दशकातील स्थिती पहाता हा पक्ष संपेल असेच सर्वांना वाटत होते. मात्र १९८३- ८४ च्या काळात वसंतदादा पाटलांनी ‘मुंबई केंद्रशाशीत करण्याचा डावा आहे ‘ असे पिल्लू सोडून दिले. शिवसेनेने हा मुद्दा लगेच उचलून धरला. मरगळ आलेल्या शिवसेनेत अचानक उत्साह संचारला. मुंबईसाठी कार्यकर्ता पून्हा एकदा पेटून उठला. त्याच काळात राम मंदीराचा प्रश्न समोर आला. शिवसेनेने त्यातही उडी घेतली. विषय देशभर पेटला. मात्र त्याचा थेट राजकिय फायदा शिवसेनेला झाला. गोरेगाव विधानसभेची पोट- निवडणूक शिवसेनेने राम नाम आणि गर्व से कहो हिंदू है, या मुद्द्यावर जिंकली, हा मुद्दा पुढच्या निवडणुकांतही अग्रस्थानि राहीला. त्यामुळे शिवसेनेला नवसंजिवनी मिळाली. तीच स्थिती आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहें, पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे नव्याने पक्ष संघटनेची रचना करत आहें आणि ते नव्या राजकीय अध्यायाला जणू सुरुवात करणार असल्याने मनसे पक्षाला चांगले दिवस नक्कीच येईल असे संकेत मिळतं आहें.

19 व्या वर्धापन दिनी काय म्हणाले राजसाहेब?

राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत. आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवालं व्हायचं नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे. मनसेच्या 19 वा वर्धापन दिनानिमित्ताने चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा राजकीय चिखल झाल्याची खंत व्यक्त केली. राजकीय मतांसाठी तुमची डोकी फोडत आहेत. हे आमच्या लोकांना समजत नाही असंही ते म्हणाले. मी गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार आहे, त्यामुळे आता चाकू, सुरे काढण्यात अर्थ नाही असं सांगत त्यांनी जास्त बोलणार नसल्याचं सांगितलं.

मनसेला मिळणार नवसंजीवनी?

राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मनसेही शिवसेनेसारखीच संघटना. त्यांचे कार्यकर्तेही शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एक कलमी अंमल. बाळासाहेबच राज यांचे आयडॉल. राज यांची काम करण्याची शैलीही बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक आणि एक कलमी…मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणे हा दोन्ही पक्षांचा अजेंडा असल्याचे दिसत आहें,

शिवसेनेचा आक्रमक पण खडतर इतिहास विसरून चालणार नाही. मनसेही अशीच आक्रमक संघटना आहे. मराठीच्या मुद्यावर मनसेने पहिल्याच निवडणूकीत १३ आमदार निवडून आणले होते. जर पुन्हा नव्याने पक्षाची मोट बांधली गेली तर मनसे नक्कीच मुसंडी मारेल. शिवाय राजसाहेब ठाकरे यांचा करिश्मा आजही कायम आहे. त्यांच्या करिश्मावर पक्षाला आणि स्वत: राजसाहेबांना विश्वास आहे. बाळासाहेबांनी आपल्या करिष्म्याच्या जोरावर वाईट स्थितत असलेल्या शिवसेनेला बाहेर काढले. राजसाहेब सुद्धा तसे करू शकतात हा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे. शिवाय पक्षात येणारे चढ उतार राजसाहेबांना नवे नाहीत. त्यांनी बाळासाहेबांसोबत राहून अनेक चढ उतार बघितले आहे, त्यामुळं ते कधीही खचणार नाही. ते फक्त संधीच्या शोधात आहेत. ती मिळाल्यास आजचे चित्र नक्कीच बदलेले आणि पक्षाला नवसंजीवनी मिळेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here