“सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न”
भारतीय जनता पार्टी आदिवासी समाजाचे तड़फदार महामंत्री शुभम गेडाम यांनी तिन्ही गावांची मागणी मान्य करून आदिवासी समाजात नवा विश्वास निर्माण केला”
चंद्रपूर :- मसाळा जुना, सिनाळा, नवेगांव (दि. २२/०३/२०२५) : राष्ट्रीय क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या १९२ व्या जयंती निमित्त गोंडवाना आदिवासी समाजाने आयोजित केलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमात एक महत्वपूर्ण घटना घडली. आदिवासी समाजाच्या तिन्ही गावांच्या समस्यांकडे लक्ष वेधून शुभम गेडाम यांनी आदिवासी समाजातील नागरिकांची मागणी मान्य करून त्यांना एक नवा विश्वास दिला.
News reporter :- अतुल दिघाडे
कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेते आणि विकासपुरुष मा.आ. श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शुभम गेडाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शुभम गेडाम यांनी या कार्यक्रमाद्वारे ना फक्त आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन दिले, तर त्यांची ऐतिहासिक मागण्या देखील मान्य करून समाजात एक महत्त्वपूर्ण जागा निर्माण केली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यावर आतापर्यंत अन्य कोणत्याही नेत्यांनी विशेष लक्ष दिले नव्हते. शुभम गेडाम यांच्या प्रयत्नांमुळे सुधीर मुनगंटीवार, तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांचे समर्थन मिळाल्यामुळे या समाजातील नागरिकांच्या मनात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सगडे गांव आदिवासी समाज, चांदागढ़ टिम, आणि गावकऱ्यांनी योगदान दिलं, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महामंत्री रामपाल भैय्या सिंग, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितिन भाऊ भटारकर आणि भाजपाच्या इतर नेत्यांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक कार्यकमाला शिरपेच बांधला.
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला एक नवा जोश आणि एकात्मतेचा संदेश मिळाला आहे.