Home चंद्रपूर ओमॅट वेस्ट लि (सिद्धबली) कंपनीत मृत पावलेल्या सिकंदर यादव परिवाराच्या कुटुंबियांना 45...

ओमॅट वेस्ट लि (सिद्धबली) कंपनीत मृत पावलेल्या सिकंदर यादव परिवाराच्या कुटुंबियांना 45 लाख द्या.

मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांची मागणी, मागणी मान्य न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा.

चंद्रपूर :-

जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्ट लि ताडाळी (सिद्धबली) कंपनीत दिनांक 16 जानेवारी 2025 ला एक स्फ़ोट झाल्याने निखिल वाघाडे, लल्ला वर्मा व शिकंदर यादव हे तीन कामगार जखमी झाले होते व या सर्व कामगारांना चंद्रपूर मधील कुबेर च्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले, दरम्यान शिकंदर यादव हा जास्त भाजला असल्याने व त्याची प्रकृती गंभीर असल्याने दोन दिवसाने त्याला नागपूर च्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते, मात्र 3 फरवरी 2025 रोज सोमवारला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, त्यावेळी त्याच्या नातेवाईक पत्नीला कंपनीने 20 हजार नगदी आणि 7 लाखाचा चेक दिला होता, सिकंदर यादव हे मूळचे उत्तरप्रदेश चे रहिवासी आहें व त्यांच्याकडून कुणीही बोलायला तयार नसल्याने कंपनीने त्यांच्या पत्नीला तुटपुंजी रक्कम देऊन कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या हक्काला पायादळी तुडविले आहें व त्याच्या परिवारावर अन्याय केला आहें, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देऊन सिकंदर यादव या मृत कामगाराच्या कुटुंबियांना 45 लाख रुपये नुकसान भरपाई द्या अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कंपनी प्रशासनाला दिला आहें, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार विभाग जिल्हा अध्यक्ष मनोज तांबेकर इत्यादीची उपस्थिती होती.

ओमॅट वेस्ट लि ताडाळी (सिद्धबली) कंपनीत 16 जानेवारी 2025 ला घडलेल्या अपघातात जखमी कामगारांच्या न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेद्वारे आंदोलन केले होते व जखमी कमागारांचा चांगल्या प्रकारे उपचार व्हावा यासाठी कंपनी व्यवस्थापन व रुग्णालय व्यवस्थापन यांच्याकडे पाठपुरावा केला होता, दरम्यान ओमॅट वेस्ट लि ताडाळी, चंद्रपूर या कारखान्यात सन २०२४ मध्ये श्यामसुंदर नत्थुजी ठेंगणे व अजय कुमार राम या कामगाराचा दुर्घटनेत मृत्यू झालेला होता. त्यावेळी श्यामसुंदर नत्थुजी ठेंगणे या कामगाराच्या परिवाराला 45 लाख रुपये मनसे कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे मिळाले होते तर अजय कुमार राम हा कामगार परप्रांतीय असल्याने त्याच्या नातेवाईकांना कंपनीने परस्पर पैसे देऊन त्याचा मृतदेह त्याच्या प्रांतात पाठविला होता.

खरं तर एखाद्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर कामगार भरपाई कायदा, १९२३ नुसार ते कामाच्या ठिकाणी मृत्यु भरपाईसाठी पात्र आहेत व त्याला त्याच्या आजच्या वयाच्या हिशोबाने मृत्यू नंतर त्यांच्या वारसाना ती रक्कम मिळते, समजा कामगार ३५ वर्षांचा असेल व त्याला ₹१२,००० पगार मिळवतो. तर मृत्यु भरपाई सूत्र वापरून मृत्यु लाभाची गणना केल्यानंतर मृत्यू भरपाई = ५०% x १२००० x १९७.०६ ₹११,८२,३६० अशा प्रकारे, कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ₹ ११,८२,३६० भरपाई मिळेल. मृत पावलेला सिकंदर यादव हा ३० वर्षाचा होता व त्यांचे वेतन हे ३० हजार होते तर या सूत्रांनुसार आजच्या घडीला किमान ३० लाखाच्या वर नुकसान भरपाई त्याच्या कुटुंबियांना मिळायला पाहिजे परंतु सिकंदर शेख याच्या पत्नीला केवळ ७ लाख नुकसान भरपाई दिली आहें हा त्याच्या कुटुंबावर अन्याय आहें. त्यामुळे त्याच्या पत्नीला श्यामसुंदर नत्थुजी ठेंगणे यांच्या वारसाना जी 45 लाखाची रक्कम दिली तीच रक्कम सिकंदर च्या पत्नीला देण्यात यावी, एकाच कंपनीत दोन कामगारांना दोन वेगळे न्याय हे लागू होणार नाही त्यामुळे त्वरित ओमॅट वेस्ट लि ताडाळी कंपनीने सिकंदर यादव याच्या पत्नीला 45 लाख नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ओमॅट वेस्ट लि ताडाळी विरोधात मनसे स्टाईल आंदोलन करेन त्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास स्वतः कंपनी व्यवस्थापन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त व औद्योगिक सुरक्षा व आरोग्यचे उपसंचालक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here