Home चंद्रपूर पंचनामा :- RTO कार्यालयात मृत व्यक्तीला जिवंत दाखवून रजिष्ट्रेशन करणाऱ्या मोरे, मेश्राम...

पंचनामा :- RTO कार्यालयात मृत व्यक्तीला जिवंत दाखवून रजिष्ट्रेशन करणाऱ्या मोरे, मेश्राम वर गुन्हे का नाही?

RTO कार्यालयातील वाहन धारक यांच्याकडून मोरे आणि मेश्राम यांनी ठरविले लुटीचे दरपत्रक? पण एसीबी अनभिज्ञ?

RTO चा पंचनामा भाग :-12

चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या भ्रष्टाचाराचा चितरकथा आता सर्वसामान्य वाहन धाराकांना जिव्हारी लागणाऱ्या असून प्रत्येक कामासाठी यांचे दरपत्रक ठरलेले आहें, त्यांचे दरपत्रक बघून कुणी सज्जन व्यक्ती म्हणेल की हे काय हॉटेल चं मेन्यू कार्ड आहें का? एवढी भयंकर स्थिती RTO किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांनी इथे करून ठेवली आहें, दरम्यान ज्या मृत व्यक्तीला जिवंत दाखवून त्याच्या वाहनाचे दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करण्यात आले तो मृत व्यक्ती RTO कर्मचारी लाड यांनी बघितला आणि त्या कामाचे अतिरिक्त 1200/- रुपये मोरे आणि मेश्राम यांना मिळाले त्यात आनंद मेश्राम ची स्वाक्षरी सुद्धा आहें, महत्वाची बाब म्हणजे जेंव्हा ही बाब नयन साखरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मृत व्यक्ती असलेल्या किसन कुंभारे यांचा मृत्यू दाखला काढला आणि तो रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये देऊन RTO अधिकाऱ्यावर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली तेंव्हा कुठे RTO कार्यालय जागे झाले आणि त्यांनी आपला एक अधिकारी समोर करून रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला लावली आणि त्यात गाडी घेणाऱ्या एकनाथ एकोणकर व एजंट उराडे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी तो मृत व्यक्तीला व्हेरिफाय केलं आणि ज्या किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांनी 1200/- रुपये कमिशन घेतले त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले नाही आणि आता हे प्रकरण भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर गाजत असल्याने पोलिसांकडून पुन्हा या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहें.

RTO कार्यालयात सगळीच कामे ही दलालामार्फत होतात याची अनेक उदाहरणे असून RTO तेलंगना सिमा नाक्यावर ज्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते याला एसीबी मार्फत अटक करण्यात आली त्यावेळी त्यांच्यासोबत एक एजंट (दलाल)ला सुद्धा अटक करण्यात आली, हिचं परिस्थिती RTO कार्यालयात सुरु असून टाटा जेनान ही मालवाहक गाडी मृतक किसन कुंभारे यांनी मृत्यूपूर्वी रुतीकेश रामबाळ राहणार चंद्रपूर यांना नोटरी करून देऊन विकली परंतु कोरोनाच्या काळात किसन कुंभारे यांचा मृत्यू झाला, दरम्यान ही गाडी रुतीकेश रामबाळ यांनी एकनाथ एकोणकर यांना किरायाने दिली पण किरायाने गाडी परवडत नाही त्यामुळे ही गाडी मला विकून टाक असे एकनाथ एकोणकर यांनी रुतीकेश रामबाळ यांना विचारले पण ह्या गाडीचा मालक मरण पावला असून तुम्ही गाडी घ्या आणि जुन्याच कागदपत्राने ही गाडी चालवा, त्यावर एकनाथ एकोणकर यांनी मी बघून घेतो असे म्हणून त्यांनीच मृत व्यक्तीच्या नावावर दुसरा व्यक्ती उभा करून आशिष उराडे या एजंट च्या मार्फत RTO कार्यालयात त्या गाडीचे ट्रान्सफर रजिस्ट्रेशन केले, त्यात एजंट आशिष उराडे यांनी रवी नावाच्या RTO कार्यालयात मोरे आणि मेश्राम ची वसुली करणाऱ्याला 1200/- रुपये दिले व त्यांनीच हे ट्रान्सफर रजिस्ट्रेशन केलेलं होते, याचा अर्थ मृत व्यक्तीच्या नावाची जी गाडी होती त्या मृत व्यक्तीच्या बदल्यात दुसरा व्यक्ती उभा करून त्या गाडीचे ट्रान्सफर रजिस्ट्रेशन करण्यात आले. त्यात मृत व्यक्तीला व्हेरिफाय कारण्याचं काम हे RTO प्रशासनाच आहें त्यात जर एजंट ने कागदपत्रे कार्यालयात जमा केल्यानंतर त्यावर विश्वास ठेऊन जर RTO अधिकारी गाड्यांचे रजिस्ट्रेशन करत असेल तर हे कार्यालय एजंटचं चालवत आहें हे स्पष्ट होते. परंतु या प्रकरणात रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये जे एजंट आशिष उराडे आणि गाडी विकत घेणारे व ज्यांनी मृत व्यक्तीच्या नावावर दुसरा व्यक्ती उभा केला ते एकनाथ एकोणकर या दोघांवार गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र या गाडीचे ट्रांसफर रजिस्ट्रेशन ज्या RTO अधिकारी मोरे यांच्या सहमतीने आणि मेश्राम यांच्या सह्यानीशी झाले त्या RTO अधिकारी यांना सोडून पोलीस स्टेशनं मध्ये फक्त दोघांवर गुन्हे दाखल झाले, महत्वाची बाब म्हणजे अडीच वर्षापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर सुद्धा चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आली नाही.

RTO कार्यालयातील एजंट च्या माध्यमातून मोरे आणि मेश्राम यांनी ठरविलेले दरपत्रक.

RTO कार्यालयात मोठ्या प्रमाणात जी वाहन धारकांच्या रजिस्ट्रेशन करिता अवैध वसुली केली जाते त्या सर्वांचे दरपत्रक मोरे आणि मेश्राम यांनी तयार केले आहें, ते बघून ह्या RTO अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक पद्धतीने ओवाळणी करून सत्कार करावा अशी विदारक परिस्थिती दिसत आहें.या कार्यालयात साधा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर

1) 50 ₹ मेश्रान 50₹ तृप्ते बाबू यांना द्यावे लागते, *लायसन्स रेन्युअल करिता 100 क्लार्क                                                    2) लर्निंग लायसन्स न्यू 300 ₹                                               3) एक्साम पैड 200₹ इन्स्पेक्टर                                              4) पर्मनंट लायसन्स 250/- टू व्हीलर फॉर व्हीलर 450/- दोन्ही 650/-                                                                                  5) Without ट्रायल 6000/- पोकलेनं जेडीबी 3000/- मेश्राम 3000/- इन्स्पेक्टर                                                                  6) PTI 15 वर्ष झालेल्या गाड्याबचे पासिंग 300 टू व्हीलर 500/- फोर व्हीलर                                                                    7) ट्रांसफर टू व्हीलर 300/- फोर व्हीलर 400/-                          8) लायसब्स पार्टक्युलर 100/- RC पर्टीक्युलर 50                    9) पोसिंग ऑटो थ्री व्हीलर 300/- एक वर्ष दोन वर्ष 600/- छोटा हत्ती पिकअप 500/- एक वर्ष 1000/- दोन वर्ष वरती जास्त असल्यास 500/-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here