Home चंद्रपूर आदिवासी कुटुंबाची जमीन हडपूण त्यावर अतिक्रमण करणाऱ्या श्रीमंतावर कारवाई करा.

आदिवासी कुटुंबाची जमीन हडपूण त्यावर अतिक्रमण करणाऱ्या श्रीमंतावर कारवाई करा.

शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.कोण आहेत ते श्रीमंत?

चंद्रपूर:-

जिल्ह्यात आदिवासीच्या जमिनी श्रीमंत लोकांनी मोठया प्रमाणात बाळकावल्या असून त्यासाठी शासन प्रशासन जणू त्यांना मूक संमती देतं असल्याचा भयंकर प्रकार सुरु आहें, यात आदिवासी जमीन धारक मात्र गरिबीच्या बोझ्यात दबून महसूल प्रशासनाकडे तक्रारी देतो पण त्यांच्या तक्रारी कुणी ऐकून घ्यायला तयार नसतात आणि मग कालांतराने त्या जमिनीवर श्रीमंत लोकं मालकी हक्क गाजवून मूळ आदिवासीच्या जमिनी हडप करतात.

असाच एक प्रकार चंद्रपूर येथील घडला असून तूकुम परिसरातील स्टेट बँक कॉलनीत राहणाऱ्या पंचफुला कुळमेथे यांच्या आदिवासी कुटुंबावर गेल्या १५ वर्षा पासून गैरआदिवासी श्रीमंत लोकांनी अतिक्रमण करून तिथे घर बांधकाम केले आहें, दरम्यान या आदिवासी कुटुंबाची जमीन त्यांना परत मिळावी किंव्हा त्या जागेचा बाजार भावाप्रमाणे मोबदला द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारें यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहें. यावेळी धनराज कोवे आदिवसी सेल जिल्हा अध्यक्ष भाजपा मनोज खांडेकर उपस्थित होते.

कोण आहेत ते आदिवासीच्या जमिनीवर अतिक्रमण करणारे?

तुकुम येथील भगवान भिवा कुलमेथे यांची शेत जमीन सर्वे न.१९/२ आराजी जवळपास 0.70 हे आर असून आदिवासी कुटुंबाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यावर अनेक बिल्डर व श्रीमंत लोकांनी त्यांचा जमिनीवर अतिक्रमण करून तिथे घर बांधकाम केले आहें, यामध्ये १)तेजस दवे २)दिलीप वावरे ३)बादल उराडे ४)मोना दवे ५)अभय कच्छवा ६)कच्छवा यांची नावे समोर येत असून कुळमेथे यांची वारसान असलेली मुलगी पंचफुला वसंता मडावी ही वडिलांची जागा मिळावी म्हणून कायदेशीर लढा देत आहें, मात्र शासन प्रशासन त्यांच्या या लढ्याला भीक घालत नसल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडू हजारें यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे त्यामुळे आता या लढ्याला यश येईल का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here