वरोरा भद्रावती व चंद्रपूर येथील अवैध परवाने संबंधात मनसेने केली होती एसआयटी चौकशी ची मागणी.
चौकशीच्या भीतीने अनेक बेकायदेशीर परवाने धारक अज्ञात वासात?
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक थोरातसह इतर निरीक्षक यांच्या माध्यमातून बोगस कागदपत्राद्वारे शेकडो परवाने वाटप केल्याच्या अनेक तक्रारी मंत्रालय स्थरावर करण्यात आल्या होत्या त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी स्थानिक प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केली होती, दरम्यान ९ मे २०२४ रोजी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंहराव पाटील यांच्यावर बिअर शॉप परवान्या करिता एक लाखाची लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर एसीबी ने कार्यवाही केली होती, त्या प्रकरणात त्यांचे दोन अधीनस्त अधिकारी यांना एसीबी ने रंगेहात अटक केली होती त्यामुळं राज्य उत्पादन शुल्क विभागात जे दारूचे परवाने वाटप करण्यात आले त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा पर्दाफाश झाला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करत नियम डावलून परवाने वाटल्याचे उघड झाले होते, अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनाकडून या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती व जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा या प्रकरणी एसआयटी चौकशीची शासनाकडे मागणी केली होती त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले असून या समितीचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक तथा भ्रष्टाचारविरोधी विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण हे उद्या चंद्रपूर जिल्ह्यात येणार असून ते दोन दिवस या संबंधाने संपूर्ण चौकशी करणार आहें, त्यात कुणाला बेकायदेशीर परवाने दिले, कुणाकडून किती लाच घेतली व किती परवाने बेकायदेशीर आहेत याबद्दल आढावा घेणार आहें, त्यामुळे शेकडो परवाने धारक धास्तावले आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठविण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसींवरून जून २०२१ मध्ये जिल्ह्यातील मद्यबंदी हटवण्यात आली. त्यानंतर परवाने देण्याच्या प्रक्रियेला वेग आला, मात्र ही प्रक्रिया भ्रष्टाचाराने बरबटल्याचे समोर आले आहे. अनेक परवाने निकष डावलून वाटल्याचा आरोप असून, त्यावर SIT मार्फत सखोल चौकशी केली जाणार असल्याने कित्तेकांनी आत्तापासूनच आपले दुकान बंद केल्याची माहिती पुढे आली आहें. यामध्ये वरोरा भद्रावती तालुक्यातील अनेक परवाने व देशी दारू दुकानाचे स्थानानंतर बेकायदेशीर असल्याने त्यांचेवर निश्चितपणे करवाई होईल अशी दाट शक्यता आहें.
एसआयटी अधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या परवान्यांचे नूतनीकरण कसे झाले? कुणाला कोठून परवाने मिळाले? परवान्यांच्या बदल्यात कोणत्या अधिकाऱ्यांनी किती लाच घेतली? या सर्व प्रश्नांची उत्तरे SIT कडून शोधली जाणार आहेत. SIT चे अध्यक्ष आणि भ्रष्टाचारविरोधी विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवान यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चौकशीत दिनांक ७ आणि ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत चंद्रपूर विश्रामगृह येथे नागरिक आपल्या तक्रारी आणि पुरावे सादर करू शकतात असे आवाहन करण्यात आले आहें.