आय.डी.एफ.सी बैंकेच्या व्यवस्थापककडे मराठीतून संवाद साधण्याचा व सर्व कामकाज मराठीतून करण्याचा दिला दम.
चंद्रपूर :–
बॅकेचं कामकाज मराठीतच हवं ह्यासाठी रिझर्व्ह बॅकेचं पत्रक आधी बघून आपल्या बैंकेत मराठी भाषेतून कामकाज चालवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देतं चंद्रपूर मनसे पदाधिकारी यांनी आय.डी.एफ.सी बैंकेच्या व्यवस्थापककडे निवेदन देऊन दम दिला, यावेळी बैंकेच्या कार्यालयात भिंतीवर असलेले इंग्रजीतील जाहिरात पत्रक काढून व बोर्डावरील इंग्रजी भाषेतील मजकूर खोदून मराठीत सर्व जाहिरात व फलक लावा असा आग्रह सुद्धा करण्यात आला यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होत.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात राज्यातील सर्व बैंकेतील कामकाज मराठीतून व्हावं यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी प्रत्येक बैंकेत जाऊन प्रथम बैंक अधिकाऱ्यांना समज द्यावी आणि जर त्यांनी मानलं नाही तर खळखट्याक करावा असे आवाहन केले होते त्यांचे पडसाद दुसऱ्याच दिवशी पडले आणि महाराष्ट्रातील बहुतांश बैंकेत महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन अगोदर पत्र दिलं काही ठिकाणी मुजोर असणाऱ्या बैंक कर्मचारी अधिकाऱ्यांना चोप पण दिला, त्यांचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पडले आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर शहरातील आय.डी.एफ.सी बैंक गाठून तिथे असणाऱ्या इंग्रजी व्यवहाराची काउघडनी करून एक पत्र दिलं आणि बैंक कार्यालयातील सर्व इंग्रजी तुन लिहिलेल्या जाहिराती आणि पत्रके फाडून निषेध केला.
काय आहें रिजर्व बैंकेचे मराठी भाषेविषयी नियम काय आहें मनसे चा आग्रह.
रिझर्व्ह बँकेचं परिपत्रक बँकेत मराठीचा वापर करण्यासाठी आपल्याला बाध्य करत आहें, ह्या परिपत्रकात अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी (१) ह्या अधिसूचनेच्या पहिल्याच मुद्यात असं म्हटलं आहे की बँकेतले सगळे सूचना फलक हे इंग्रजी, हिंदी आणि त्या त्या भागातील स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत लावायला हवेत. तसंच ग्रामीण आणि निम-शहरी भागातली पोस्टर्स ही स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत असली पाहिजेत. २) बैंकेत ज्या पुस्तिका ठेवलेल्या असतात त्या सगळ्या पुस्तिका हिंदी, इंग्रजीत आहें जेंव्हा की त्या मराठीतही असायला हव्यात. ३) पुढचा भाग अजून महत्वाचा आहे. त्यात म्हटलं आहे की ग्राहकांशी बँकैचा संवाद होईल तो हिंदी आणि त्याबरोबरच मराठी मध्येही असायला हवा. आपली बँक तर कितीतरी वेळा ग्राहकांशी संपर्क करते. बँकेचा एसएमएस येतो, पत्र येतं किंवा जे ऑनलाईन व्यवहार करतो ते ही खरंतर मराठीत हवे आहेत. पण ते असतात का? ह्याकडे आपलं लक्ष द्यायला हवं. ४) धनादेश म्हणजे चेक्स लिहिण्यासाठीही रिझर्व्ह बँकेनं असं सांगितलं आहे की धनादेश बैंक छापेल हिंदी आणि इंग्रजी भाषेत परंतु तुम्ही स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत धनादेश किंवा चेक्स लिहू शकता.
बैंकेचे कामकाज जनतेच्या सगळ्या थरात पोहचावं म्हणून बँकांनी त्यांचं सगळं छापील साहित्य तीन भाषांत करावं अशाही पुढे सूचना आहेत. ह्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ४.३ ह्यावर भाष्य केलं तर खातं उघडण्यासाठी लागणारा अर्ज, पैसे भरणा करण्याचा अर्ज (pay in slip), खाते पुस्तक (पास बुक) अशा सर्व सर्व गोष्टी मराठीत असाव्यात असं हा नियम सांगतो. त्यातल्या त्यातः मुद्दा क्रमांक १.१ (सी), १.१ (ई), १.१ (एफ), ४.३, ५.७.२, ८.३.१ हे बघून त्यावर अमल करावे अन्यथा आपल्या बैंकेचीं रिजर्व बैंकेकडे तक्रार होईल आणि नाही ऐकलं तर मग आम्ही खखट्ट्याक आंदोलन करू असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी बैंक अधिकाऱ्यांना दिला.