पक्ष मज़बूतीसाठी पार पड़ली चंद्रपूर जिल्हा महिला ग्रामीण कांग्रेस कमेटी ची बैठक !
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी व संघटन वाढीसाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष सौ.सुनंदा ताई धोबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
समस्त तालुका महिला पदाधिकारी व शहर अध्यक्ष मिळून संघटन मजबूती व पक्षवाढीबद्दल चर्चा करण्यात आली.
गाव आणि शहर इथे काँग्रेस ला मजबूत करण्याचा आणि काँग्रेस पक्षाला भविष्यात बळकट कस करता येईल यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष सौ.सुनंदा ताई धोबे यांनी सर्व तालुका अध्यक्ष, पदाधीकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सदर बैठकीस चंद्रपूर शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे, सावली तालुका अध्यक्ष उषाताई भोयर, राजुरा तालुका अध्यक्ष निर्मलाताई कुळमेथे बल्लारपूर तालुका अध्यक्ष अफसानाताई सय्यद, कोरपना तालुका अध्यक्ष आशाताई खातरे, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष सोनूताई दिवसे, मूल तालुका अध्यक्ष रुपालीताई संतोषवार, भद्रावती तालुका अध्यक्ष संध्याताई पोडे, संध्या चांदेकर, रेखा वैरागडे, संध्याताई पिंपळकर, कविता सुफी, गौरी भुसारी, रुपाली वाढीभस्मे, कामिनी उईके, अर्चना चंदावा, कविता मून, वैशाली बुरांडे, नंदा मुसने, मंगला लोणबळे, सीमा सहारे, आशा ताई आस्वले, लता काकडे, पोहनकर मॅडम, सीमाताई रेशमाताई नंदाताई लोणगाडगे, कविता धोबे, रोशनी धोबे, गौरी धोबे, चैताली धोबे, सीमा भोयर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.