अस्ताव्यस्त पडलेल्या विदेशी दारूच्या वाटला नागरिकांनी पळवल्या, ३४० च्या ९० एमएल चा बाटल पोलिसांना मिळाल्या !
भद्रावती प्रतिनिधी :-
एकीकडे कोरोना च्या भितीने देशातील प्रत्त्येक नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरता स्वतःहून संचारबंदी लादून घेतली आणि स्वतःच्या घरी होता मात्र दारू तस्करानी याच संधीचा फायदा घेवून निर्मनुष्य रस्त्यांने आपल्या दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असतांना स्विफ्ट डिझायर MH 32C 9980 ही कार वरोरा भद्रावती रोडच्या टाकळी गावाशेजारी आली असता ती चार कलाटन्या खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली, या कार मधे विदेशी दारू वाहतूक होतं होती त्यापैकी अनेक दारूचे बॉक्स खाली पडले असता त्यातून तिथे पौहचलेल्या नागरिकांनी दारूचा मोठा साठा पळवला, मात्र या अपघातात ड्रायव्हर वशीम लियाकत अली वय २८ वर्ष रा.खंजर वार्ड वर्धा हा जागीच ठार झाला तर सोबत असलेला हिंगणघाट येथील फारूक हबीब शेख हा गंभीर जखमी आहे.
या घटनेने दारू माफियांची पोलखोल झाली असून दारू वाहतूक करणारी ती स्विफ्ट डिझायर कार नेमकी कुणाची आहे हा तपास सुरू असून अद्ण्यात आरोपी विरोधात कलम 279,334,304 व 184 अंतर्गत गुन्हा भद्रावती पोलिस स्टेशन मधे दाखल केला असून ९० एमएल च्या ३३४ ओसी दारूच्या बॉटल व कार असा ऐकून ३ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जब्त केला आहे या प्रकरणी ठाणेदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक गजानन तेलरान्धे व हवालदार सूर हे तपास करीत आहे.