Home भद्रावती भद्रावती येथे संचारबंदीला नागरिकांचा भरघोस पाठिंबा, सर्व बाजारपेठ व दुकाने बंद !

भद्रावती येथे संचारबंदीला नागरिकांचा भरघोस पाठिंबा, सर्व बाजारपेठ व दुकाने बंद !

कोरोना व्हायरस वर जनतेचा प्रतिबंध

जावेद शेख/उमेश कांबळे भद्रावती :-

देशात कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जनतेने स्वतःहून लावलेली संचारबंदीची घोषणा आता १०० टक्के यशस्वी होताना दिसत असून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील सर्व बाजारपेठ व दुकाने बंद ठेवून भद्रावतीकरानी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आज सकाळी ७ वाजेपासून ठाणेदार सुनील सिंह पवार, पोलिस वैन सोबत नगर पालिकेचे मुख्य अदिकारी गिरीश बंनोरे, तहसीलदार महेश शीतोड़े यांनी शहरात फिरून  जनतेला सूचना दिल्या होत्या त्या सूचनेचे काटेकोरपणे भद्रावतीतील जनतेने पालन करून जनतेने जनतेसाठी केलेली संचारबंदी यशस्वी केली, शहरातील बस स्टैंड, बाळासाहेब ठाकरे  प्रेवश द्वार, पासून जूना बस स्टैंड जामा मस्जिद चौक ,गांधी चौक, नागमन्दिर चौक,सराफा लाइन, सब्जी मार्किट, ते गणेश मंदिर, पर्यन्त सर्व ठिकाणी शुकशुकाट दिसत होता व  सर्व रस्ते निर्मनुष्य दिसून आले, प्रथमच शहरातील दवाखाने व मेडिकल सुद्धा बंद दिसले,केवळ ग्रामीण रुग्णालय एमरजेंसी साठी सुरु होते,  जिल्हा अधिकारी यांचा आदेशानुसार काल ६,००वाजे पासून किराना भाजीपला मेडिकल, व दवाखाने, वगळता सम्पूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती या सम्पूर्ण हालचालिवर ठाणेदार सुनिलसिंग पवार, मुख्याधिकारी  गिरीश बंनोरे, तहसीलदार महेश शीतोड़े, नायब तहसीलदार कळी ,ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर किन्नाके या सम्पूर्ण परिस्तित्वर लक्ष ठेवून होते

Previous articleब्रेकिंग न्यूज :-भद्रावती जवळ दारूची गाडी पलटली, ड्रायव्हर जागीच ठार तर एकाची प्रकृती गंभीर !
Next articleकोरोना पुढे देवांनीही मैदान सोडले, संजय राऊत यांचे सामना तून धर्मांधांना टोमणे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here