आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या त्या आंदोलनाची दखल घेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरोधी ऑपरेशन मिशन सुरु.
चंद्रपूर:-
एकीकडे देशात आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविल्या गेले व देशाच्या सैन्याने आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले, त्यामुळे देशात जल्लोष केला गेला, दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात हजारो हुशार विद्यार्थ्यावर भ्रष्टाचाराचा सुरा खूपसून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या अध्यक्ष आणि संचालकांसह सिइओ यांनी 360 पदाच्या नोकर भरतीत 100 कोटींपेक्षा मोठा भ्रष्टाचार केला व हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती, त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह आरक्षण बचाव संघर्ष कृती समितील विविध राजकीय सामाजिक संघटनांनी एल्गार पुकारून तब्बल 28 दिवस आंदोलन केले होते, याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी चे आदेश दिल्यानंतर आंदोलन स्थगित केल्या गेले, मात्र शासनाकडून स्थापित समितीला बैंकेच्या सिइओ ने उच्च न्यायालयात आव्हान देतं त्यावर स्थगिती आणली, याबाबत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्टाचार विरोधात आपले सिडीसीसी ऑपरेशन मिशन च्या माध्यमातून एसआयटीचा बॉम्बगोळा टाकून सिडीसीसी च्या नोकर भरतीचे भ्रष्ट बुरुज उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु केले आहें. यामुळे ज्या ज्या संचालकांनी आणि सिइओने पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या त्या सर्वांची गुप्तपणे चौकशी होऊन कुणी कुणी कुणामार्फत पैसे दिले त्या सर्वांचे चेहरे उघड होणार असल्याने जिल्ह्याचा कोट्यावधी भ्रष्टाचार उघड होऊन सर्वावर गुन्हे दाखल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहें.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होतात. नोकरभरतीत पैसे खाल्ले जातात. आरक्षण हद्दपार केले जाते. तरीही कारवाई होत नाही. चंद्रपूर जिल्हा बँकेमध्ये आरक्षण धुडकावून लावण्याचा प्रताप संचालक मंडळाने केला. दिव्यांग, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे आरक्षण असले पाहिजे. पण, यापैकी कुणालाही आरक्षण दिले गेले नाही. जी नोकरभरती झाली, त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा मुद्दा माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी च्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्या मुद्यावरून गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती.
दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते हॅक केले. ३३ ग्राहकांचे ३ कोटी ७० लाख ६४ हजार रुपये एका अज्ञात व्यक्तीने हरीयाणाच्या खात्यात वळते केले. या दोनही प्रकरणात सूचनेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने एसआयटी लावण्यात येईल, असे ते म्हणाले होते, मात्र विभागीय चौकशीला सिडिसिसी बैंकेचे अध्यक्ष संचालक व सिइओ जुमाणत नव्हते आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान देऊन विभागीय चौकशीवर स्थगिती आणली मात्र आता एसआयटी चौकशीच्या रूपाने सिडीसीसी च्या नोकर भरती भ्रष्टाचारावर बॉम्बगोळा टाकण्यात आला असून ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला ते सर्व रडारवर येणार असल्याने बैंक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहें.