मनसे वाहतूक सेनेची RTO सह स्थानिक वाहतूक शाखेकडे तक्रार, पण तरीही कारवाई नसल्याने मनसे तर्फे आंदोलणाचा इशारा.
ट्रॅव्हल्स मधून नेमकं काय पार्सल येतंय याची कुणालाच खबर नसल्याने बंदूका, ड्रग्स व हवाला द्वारे पैसा येण्याची शक्यता?
चंद्रपूर:-
शहरातील डिएनआर या खाजगी ट्रॅव्हल्स द्वारे चंद्रपूर ते पुणे, नागपूर, गडचांदूर प्रवाशी वाहतूक यांच्यासह बेकायदेशीरपणे माल व साहित्याचे पार्सल ने-जा करून दररोज लाखों रुपयांची आर्थिक उलाढाल सुरु असतांना सुद्धा स्थानिक प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखे कडून त्यांचेवर कुठलीही कारवाई होत नसल्याने मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांच्या नेतृत्वात मनसे जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे यांच्यासह इतर महाराष्ट्र सैनिकांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व स्थानिक वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन देऊन एका आठवड्यात डिएनआर या खाजगी ट्रॅव्हल्स द्वारे वाहतूक होणारी पार्सल बंद करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेद्वारे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला, दरम्यान आठवडा उलटून गेल्यानंतर सुद्धा प्रशासनाने कारवाई केली नसल्याने मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनच्या पवित्र्यात आहें.
चंद्रपूर ते पुणे नागपूर व गडचांदूर ला जाणाऱ्या येणाऱ्या डीएनआर खाजगी प्रवासी वाहतुक ट्रॅव्हल्सद्वारे नियमबाह्रा माल वाहतुक होतं असून पार्सल सेवेच्या माध्यमातून दररोज लाखों रुपयांची अवैध उलाढाल होतं आहें, खरं तर ट्रॅव्हल्स ला केवळ प्रवाशी वाहतूक करण्याची मंजुरी मिळाली असतांना व चंद्रपूर ते पुणे, नागपूर, गडचांदूर अशी सरळ प्रवासाची मान्यता असतांना आणि ह्या ट्रॅव्हल्सला टप्पा मंजुरी नसताना नागपूर ला जातांना प्रत्येक शहर गाव ठिकाणी ह्या ट्रॅव्हल्स थांबतात त्यामुळे ट्रॅव्हल्स च्या प्रवाशी वाहतूकीच्या परवानगीची अवहेलना होतं असून यांना कुणाचे संरक्षण आहें याबाबत मोठा संशय निर्माण झाला आहें.
खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स मध्ये जे पार्सल नेण्याचे काम सुरु आहें, त्या पार्सलमध्ये नेमके काय आहें हे कुणालाही माहीत नसतं व कुठलीही पार्सल सेवेला परवानगी नसताना ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून जी पार्सल सेवा सुरु आहें व कुठलीही टप्पा परवानगी नाही तरी खुलेआम ट्रॅव्हल्स थांबा करत आहें. मात्र बेकायदेशीर ट्रॅव्हल्स मधून पार्सल सेवा सुरु आहें त्या ट्रॅव्हल्स मधून नेमकं काय पार्सल येतंय याची कुणालाच खबर नसल्याने बंदूका, ड्रग्स व हवाला द्वारे पैसा सुद्धा यामधून येण्याची शक्यता असल्याने उद्या येणाऱ्या काळात शस्त्रसाठा मिळाला तर त्यासाठी कोण जबाबदार असेल? हा प्रश्न असून सामूहिक गुन्हेगारीला यामधून बळ मिळत असल्याने ही पार्सल सेवा तात्काळ बंद करा अन्यथा महाराष्ट्ट नवनिर्माण वाहतूक सेना ह्या डिएनआर ट्रॅव्हल्स संचालका विरोधात मनसे स्टाईल आंदोलन करु असा इशारा मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी दिला आहें.