उमेदवार असणाऱ्या त्या सगळ्यांची होणार पोलखोल, नोकरीच्या बदल्यात शेती गहाण प्रकरण असो की इज्जत लुटीचा प्रकार सगळाचं इतिहास प्रसारमाध्यमाच्या रडारवर येणार?
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक म्हणजे सहकार क्षेत्रातील काही मोजक्या लोकांसाठी लुटीच केंद्र बनलं असल्याची प्रचिती येत असून नुकत्याच पार पडलेल्या आणि अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेल्या 360 पदाच्या नोकर भरतीच्या घोटाळ्याची एआयटी चौकशी लागल्याने सत्ताधारी संचालक घाबरले आहेच पण “मरता क्या नही करता.” या उक्तीप्रमाणे बिचारे हाय ब्लडप्रेशर असूनही मला काहीच झालं नाही या तोऱ्यात पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात विजयी होण्याचे स्वप्न बघत आहें. दरम्यान येणाऱ्या 10 जुलै ला होणाऱ्या निवडणुकीच्या रणसंग्रामात ते कोण भ्रष्ट संचालक आहें आणि त्यांनी कुणाला लुटलं, कुणाची इज्जत लुटली कुणाची शेती गहाण ठेवली व कुणाची जमीन विक्री करून घेतली हे सर्व आता प्रसारमाध्यमाच्या रडारवर येणार असून काहींनी आत्तापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न चालवीला असल्याची माहिती समोर येत आहें.
विद्यमान संचालक ज्यांनी सत्ता भोगली आणि नोकर भरती च्या घोटाळ्यात कमाई केली ते आता निवडणूकीच्या रनधुमाळीत घोडाबाजार भरवून जिंकण्याच्या शर्यतीत जोमात दिसत आहें, कारण त्यांच्याकडे आता सुमार पैसाच पैसा आहें, मात्र त्यांच्या या पैशाच्या व्यवहाराचे कित्तेक पुरावे सुद्धा समोर येत असल्याने त्यांच्या अब्रूचे धिंडवडे सुद्धा निघण्याची कायम भीती त्यांना आहें, दरम्यान बैंकेच्या नोकर भरती व्यतिरिक्त बैंकेतील कित्तेक घोटाळे हे समोर येत असून बैंकेच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी 17 लाख 69 हजार 53 रुपयाची उधळपट्टी असो की सशस्त्र सुरक्षा रक्षक ठेवण्यासाठी रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीला आगाऊ ची संख्या देऊन पैशाची उधळपट्टी असो, एवढेच नव्हे तर बैंकेच्या इंटरनेट बैंकिंग साठी कोट्यावधी चा खर्च असो सगळ्याचं कामात सत्ताधारी यांचं कमिशन असून त्यामुळे बैंकेला आगाऊचा आर्थिक भुर्दंड लावण्यात सत्ताधारी संचालक नेहमीच पुढे होते आता त्यांचे पानउतारे होण्याची चिन्हे दिसत आहें.
निवडणूक रंगतदार होणार?
विद्यमान संचालकांनी नोकर भरतीत मोठा घोटाळा करून कोट्यावधी रुपयाची कमाई केल्यानंतर ते त्या पैशाच्या बळावर निवडून येतील अशी शक्यता वाढली असतांना आता मात्र त्यांच्या तुल्यबळ उमेदवारांचे नामांकन फॉर्म बघितल्या नंतर विद्यमान संचालकांची हवा टाईट झालेली दिसत आहें. अर्थात एका बाजूने झुकलेली निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून कांग्रेस, भाजप, शिवसेना राष्ट्रवादी या चारही पक्षाचे नेते अंतर्गत विरोधामुळे कोण कुठे कसे जातील हे सांगता येत नाही.