Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात दिसला कोरोना व्हायरस चा इंपॅक्ट, “जनता कर्फ्यू” ला नागरिकांनी दिला...

चंद्रपूर जिल्ह्यात दिसला कोरोना व्हायरस चा इंपॅक्ट, “जनता कर्फ्यू” ला नागरिकांनी दिला प्रतिसाद!

स्थानिक नेत्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

रविवार २२ मार्च ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपुर्ण भारतामध्ये “जनता कर्फ्यू” ला नागरिकांनी प्रतिसाद दिला. चंद्रपुर मध्ये ही नागरिकांनी अपवाद वगळता बहुतेक घरामध्येच कुटुंबासोबत आपला वेळ घालविला. कुटुंब प्रमुख घरी असल्याचा आनंद मुलाबाळांसोबत कूटूंबातील सर्वांनाच झाला, त्यासोबतचं दुसर्या देशातील भयानक परिस्थिती व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात लागलेला lock down ची स्थिती बघून तुटपुंजे उत्पन्न असलेल्या सौभाग्यवतींना मात्र एवढ्यात संपणारा celender, 30 मार्चपुर्वी भरावयाचे लाईट बिल, मुलांची शाळेची फिस, दैनंदिन लागणारा खर्च कसा भागवायचे या चिंता बोलून दाखवील्यामुळे सिलेंडर बरोबर २५ दिवसचं चालते, लाईट बिल वेळेत न भरल्यास कापण्यात येतात यासारख्या गरजांची जाणीव ही आजच्या “जनता कर्फ्यू” मुळे कशी कळाली, यांचे मजेदार वर्णन काही what’s app ग्रुप वर शेअर करण्यात आले. हे मजेदार असले तरी तेवढेच गंभीर ही आहे.

घर टैक्स मधे सूट द्यावी

मात्र मार्च अखेर असल्यामुळे व उद्भवलेली  स्थिती बघता या वर्षी च्या करामध्ये या महिण्यात शिथीलता देण्यात यावी अशी मागणी व्यावसायिक करित आहेत. नुकतेच मास्क आणि सेनिटायझर वरील कर माफ झाल्याच्या बातम्या झळकायला लागल्या आहेत. त्यासोबतचं सामान्य कुटूंबाचा दैनंदिन उदरनिर्वाहाचा खर्चाबाबत ही स्थानिक नेत्यांनी गंभीर असायला हवे, फक्त फोटोसेशन पुरते मर्यादित न रहाता सामान्यांना मागील काही दिवसांत घाबरविणार्या “कोरोना इफेक्ट” चा दिलासा द्यायला हवा.

*सर्व वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार* *बंधूंना आवाहन*

आपली व परिवाराची काळजी घ्या, पञकारांना कोणत्याही प्रकारचा पगार मिळत नाही.बातमीसाठी तुमच्या मागे सर्व असतील पण तुमच्यावर रूग्णालयाचा खर्च व इतर संकटाच्या वेळी जवळच्या व्यतिरिक्त कोणी उभे राहत नाही. त्यामुळे सर्व पञकारांनी काळजी घ्यावी.पञकारांनी गावात व इतरञ फिरताना मास्क वापरावे , गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शक्यतो फोनवर संपर्क करून बातमी घ्या, एखाद्या कार्यालयात गेल्यास अधिकारी, कर्मचारी यांचेशी अंतर ठेऊन बोला, एखादी व्यक्ती बातमीसाठी भेटीला आल्यासही काळजी घ्या, नागरिक, प्रशासन यांचे प्रबोधन करा…..

Previous articleकोरपणा येथे जनतेने पाळली संचारबंदी, दुकाने बाजारपेठ बंद रस्त्यात शुकशुकाट !
Next articleमुख्यमंत्र्यांच्या आव्हाना नंतर सुद्धा वरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर आणि जीएमआर कंपनी सुरू !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here