Home वरोरा मुख्यमंत्र्यांच्या आव्हाना नंतर सुद्धा वरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर आणि जीएमआर कंपनी सुरू...

मुख्यमंत्र्यांच्या आव्हाना नंतर सुद्धा वरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर आणि जीएमआर कंपनी सुरू !

कंपनीत कोरोना रुग्ण असलेल्या नागपूर वरून अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी संख्या !

वरोरा प्रतिनिधी :-

देशात कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावाने एकीकडे शासन कसोशीने प्रयत्न करत असतांनाच दुसरीकडे नागरिक मात्र शासनाच्या या आदेशाला न जुमानता आपल्या मर्जीणे काम करीत असल्याने कोरोना व्हायरस चे रुग्ण वाढत आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व कंपन्यांना आव्हान केले की कंपनीतील सर्व कामगारांना व कर्मचाऱ्यांना येत्या ३१ मार्च पर्यंत सुट्टी द्या व कामगार, कर्मचाऱ्यांना सुट्टीचा सुद्धा पगार द्या. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर आणि जीएमआर या विज निर्मीती कंपन्या खुलेआम सुरू असल्याने स्थानिक प्रशासनाला नेमकं काय करीत आहे ? यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही कंपनीमधे कोरोनाचे पाझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या नागपूर मधून दररोज कंपनीचे कर्मचारी येत आहे. त्यामुळे कंपनी मधे येणाऱ्या एखाद्याला कोरोना झाला असेल तर कंपनीतील हजारो लोकांना कोरोना होऊ शकतो, त्यामुळे प्राथमिक उपाययोजना म्हणून वर्धा पॉवर व जीएमआर कंपनीतील कामगार कर्मचाऱ्यांना येत्या ३१ पर्यंत सुट्टी देण्यात कां आली नाही ? असा प्रश्न आता तेथील कर्मचाऱ्यांना पडला आहे.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यात दिसला कोरोना व्हायरस चा इंपॅक्ट, “जनता कर्फ्यू” ला नागरिकांनी दिला प्रतिसाद!
Next articleपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषयी दक्षतेचे केले आव्हान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here