Home चंद्रपूर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषयी दक्षतेचे केले आव्हान !

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषयी दक्षतेचे केले आव्हान !

पत्रकार परिषद घेऊन मानले शंभर टक्के बंद ठेवणाऱ्या चंद्रपूरकरांचे आभार !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात जनतेने स्वयंस्फूर्तीने जो बंद यशस्वी केला त्याबद्दल सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बांधवांचे मनापासून आभार मानून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण कुठलीही परिस्थिती असो आपण त्यावर निवारण करू शकतो हे दाखवून दिल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले, स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःची सुरक्षा स्वतः करावी असे आव्हान त्यांनी जनतेला केले. प्रशासनाच्या माध्यमातून व इकडे माननीय मुख्यमंत्री यांनी राज्यात 144 कलम लागू झालेली आहे अशा वेळी लोकांनी आता एकत्र येऊ नये, जो स्टैम्प मारलेला जो व्यक्ती आहे त्यांनी किमान पंधरा दिवस सार्वजनिक ठिकाणी किंवा घराच्या बाहेर पडू नये, जिल्ह्यात पंचेचाळीस व्यक्ती आहेत त्यांना वन अकादमी येथे ठेवले आहे त्यामधे त्यांना स्वतंत्र बाथरुम सर्व व्यवस्था केली आहे, राज्याच्या सीमा शील करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सीमा उद्यापासून बंद करण्याचा निर्णय झाला त्यात खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात येत आहे.अत्यावश्यक सेवा सूचना पालन केलं पाहिजे तरच आपल्याला यांवर मात करता येईल अन्यथा आपल्या सगळ्यांना त्रास होईल, जे काही निर्णय महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेले आहे ते सर्व लोकांच्या हितासाठी असून या बंद दरम्यान जे मजूर आज उद्यापासून पुढच्या 31 तारखेपर्यंत दररोजच्या कामाला मूकणार आहे व त्यामुळे त्यांच्या दररोजच्या जेवण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रत्तेकी २५ किलो अनाज त्यांना मोफत देण्यात येणार आहे.
त्यामुळे प्रशासनाला मदत करा असे आव्हान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here