Home चंद्रपूर धक्कादायक :-रशिया देशातून आलेल्या कोरोना बाधित एका जोडप्याला शेवटी चंद्रपूरात अटक ,

धक्कादायक :-रशिया देशातून आलेल्या कोरोना बाधित एका जोडप्याला शेवटी चंद्रपूरात अटक ,

वेकोलिच्या विश्रामगृहात बंदिस्त केले, उपचार सुरू

चंद्रपूर प्रतिनिधी :

जगात कोरोनाच्या धास्तीने राहणारे अनेक विदेशी भारतात येत असतांना जिल्हा प्रशासनाला न कळवता सरळ आपल्या घरी जातात त्यामुळेच भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे, कारण या कोरोनाच्या संसर्गाचा अतिशय वेगाने प्रादुर्भाव होत असतो असे असताना रशिया येथून चंद्रपुरात दाखल झालेल्या मात्र जिल्हा प्रशासनापासून माहिती लपवून अरेरावीने वागणाऱ्या दोघांना रविवारी पोलिसांनी वडगाव येथून उचलून वेकोलिच्या विश्रामगृहात बंदिस्त करून ठेवले आहे. या दोघांचीही करोना चाचणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.
रशिया येथून चंद्रपूर दाखल झालेल्या एका महिला व पुरुषाने जिल्हा प्रशासनापासून ते विदेशात गेले होते ही माहिती एक आठवडा लपवून ठेवली. १६ मार्चला संबंधित व्यक्ती व महिला भारतात परत आले होते, त्यानंतर ते नागपूर व चंद्रपूरला परत आले. विदेशातून आलेल्या व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केल्यानंतरही या व्यक्तीनी माहिती लपवून ठेवली आणि वडगाव येथील एका निवासस्थानी लपून बसले होते, विशेष म्हणजे, या सात दिवसात हे व्यक्ती समाजात सर्वत्र वावरत होते त्यामुळे कित्तेकांना याचा संसर्ग झाला तर नाही ना ? याचा तपास घेतल्या जात आहे.

Previous articleपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषयी दक्षतेचे केले आव्हान !
Next articleवरोरा येथे स्वच्छतेची ऐशीतैशी झाल्याने कोरोना व्हायरस पसरण्याची भिती ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here