ठेकेदारांच्या घराजवळ नालेसफाई व फवारणी ? बाकीच्यांचे काय ?
वरोरा प्रतिनिधी :-
सध्या जगात आणि भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाने चिंतेचे सावट असून हजारो लोकांचा या कोरोना व्हायरसमुळे बळी गेला आहे. या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोकायचा असेल तर परीसरात स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.मात्र वरोरा नगरपरिषद मधे सध्या नेमके काय सुरू आहे हे कळायला मार्ग नसून येथील कंत्राटदाराच्या घराजवळ नालेसफाई होते आणि त्याच्याच घराशेजारी मछर साठी फवारणी होते, मात्र चीरघर ले आउट परीसरात नालेसफाई तर कित्तेक दिवस होतच नाही शिवाय मच्छर मारण्यासाठी करण्यात येत असलेली फवारणी ही कंत्राटदार यांच्या नातेवाईकांच्या घराजवळ होऊन बाकीचे नागरिकांना याचा फायदा होतं नसल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आले, एकीकडे नागरिक नालेसफाई होतं नसल्याने त्रस्त आहे तर दुसरीकडे या परीसरात जी घंटा गाडी येते त्या घंटा गाडीचे चालक हे दारू प्यायला वार्डात जात असल्याने घंटा गाडी रस्त्यावर उभी असते त्यामुळे कधी कधी रहदारीचा प्रश्न सुद्धा निर्माण होतं आहे, खरं तर नालेसफाई वेळेवर होतं नसल्याने नाल्यांची दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भिती आहे, याबाबत माहिती घेतली असता हे काम आशीफ रजा यांचे असून नाल्यांची सफाई त्यांच्याकडून वेळेवर होतं नाही अशी नागरिकांची तक्रार आहे ,
या संदर्भात मुख्याधिकारी बल्लाळ आणि नगराध्यक्ष अहतेशाम अली यांनी वेळीच दखल घेवून चिरघर ले आउट परिसरात नाल्यांची सफाई वेळेवर करून कोरोना व्हायरस पसरू नये याची काळजी घ्यावी अन्यथा या परिसरातील नागरिक नगरपरिषद मधे येवून ठिय्या आंदोलन करेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.