Home आंतरराष्ट्रीय जबरदस्त :- राहुल वाघ या महाराष्ट्रीयन तरुणांचे जर्मनीवरून कोरोना या भयंकर व्हायरस...

जबरदस्त :- राहुल वाघ या महाराष्ट्रीयन तरुणांचे जर्मनीवरून कोरोना या भयंकर व्हायरस बद्दल भारतीयांना आव्हान !

 

रस्त्यावर येवू नका, शक्यतोवर घरीच रहा, जर दक्षता घेतली नाही तर अख्खा भारत कोरोना व्हायरसच्या कचाट्यात येईल हे लक्षात ठेवा !

लक्षवेधी :-

जगातील श्रीमंत आणि प्रगत देश हे कोरोना व्हायरस च्या कचाट्यात सापडून आपल्या हजारो नागरिकांना वाचवू शकत नाही, मग आपला देश तर फार गरीब असून आपल्याकडे वैद्यकीय सेवा देण्यासाठी हवी ती सुविधा नाही, शिवाय आपली ऐकून लोकसंख्या बघता कोरोना व्हायरस तिसऱ्या स्टेप्स वर आल्यास एक एका दिवशी हजारो लोकांचे प्राण या कोरोना व्हायरस मुळे जाऊ शकते.त्यामुळे बाहेर निघू नका, घरीच रहा असे आव्हान महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा राहुल वाघ जो आता जर्मनी या देशात मागील २०१७ पासून वास्तव्यात आहे त्यांनी केले आहे.

ते म्हणतांत की शक्य होईल तेवढं बाहेर जाणे टाळा, जे लोकं रस्त्यावर येऊन चूक करत आहेत,
त्यांना आवाहन करा की बाहेर येऊ नका.नुसते चुका दाखवत फिरू नका..तर जागरूक व्हा, असे आव्हान जर्मनीमध्ये अडकलेला राहुल वाघ करीत आहे. खरं तर त्याला काहीही झालेलं नाहीये कारण तो एकाजागी सध्या खोलीमधे बसून आहे. आपल्या देशात म्हणजे भारतात लोकं फिरत आहेत बाहेर. आणि येणाऱ्या काळात पण फीरतील पण इटली या देशात त्यांच्या नागरिकांनी हलक्यात घेऊन सोडून दिलं. आणि अश्या हलक्या घेण्यामुळे त्यांना किती तोटा झाला हे आपणाला माहीतच आहे, कारण इटली या देशात तब्बल आतपर्यंत ५ हजारच्या वर लोक मेली आहेत तर आता तेथील मरणाचा आकडा एका दिवसाकाठी ८०० ते ९०० असा जातो आहे आणि १ लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना ग्रस्त आहे.त्यामुळे आतातरी घरी रहात, काहीतरी टाइम पास करायचा आहे म्हणून फक्त जोक करू नका. कामाला लागा. बसल्या बसल्या चांगल्या गोष्टी शेयर करा. लोकांना आवाहन करा की तुम्ही घरातच बसा १५ दिवस तरी… नाहीतर,लाशी उचलण्यासाठी लोक मिळणार नाही एवढा भयंकर संहार आपली छोटी गलती करू शकते असेही ते म्हणाले, ..लेखकांनो लेखणीचा उपयोग कसा करायचा ठरवा. सोशल मीडिया मध्ये ताकत आहे तुम्ही हे करू शकता. जागे व्हा. आधी हे ऐका. आणि ही बातमी
शेअर करा, आपण जे हलक्यात घेण्याची चूक करतोय तीच चूक एका शहराला “मेलेले लोकं सुध्दा उचलायला माणसं नव्हती” इतकी कठीण करून गेली होती. ही परिस्थिती इटलीची आहे आणि तेथील पंतप्रधान रडत आहे. त्यामुळे जर प्रगत देशात एवढी बिकट परिस्थिती आहे तर हा रोग भारतात पसरला तर आपल्या देशात हाहाकार माजेल त्यामुळे भारतीय जनतेला आवाहन करा एकच दिवस नाही, यापुढचे १०/१५ दिवस घरीच थांबा. Traveling करूच नका. हा व्हायरस भयंकर गतीने पसरतो आहे. घरातच थांबा.घरातच थांबा.आणि
प्लीज घरातच थांबा असे आव्हान राहुल वाघ यांनी जर्मनीतून फेसबुक लाईव द्वारे भारतीय जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here