Home चंद्रपूर शेवटी महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी, राज्य सिमा सुद्धा केल्या शील !

शेवटी महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी, राज्य सिमा सुद्धा केल्या शील !

चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा जिल्ह्याच्या सिमा होणार शील !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जगात कोरोनाचा व्हायरस उग्र रूप धारण करून हजारो लोकांचा दररोज जीव जात असतांनाच भारतात मात्र नागरिकांना आव्हान करून सुद्धा योग्य ती काळजी नागरिक घेत नसल्याने शेवटी महाराष्ट्रात सरकार ला ३१ मार्च पर्यंत संचारबंदी लागू करावी लागली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करूनही लोक घराबाहेर पडत असंल्याने आणि सरकारच्या सूचनांकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने आता ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.. एवढेच नव्हे तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम येणाऱ्या ३१ मार्च पर्यंत होणार नसून हे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहे, मात्र जर परिस्थिती आटोक्यात आली नाही तर पुन्हा १५ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू होऊ शकते असेही सूत्रांकडून कळते,

कोरोनामुळे चीन, इटली, इराण अमेरिका आदी देशांत मृतांची संख्या मोठी असूनही तेथील सूचना लोक ऐकत नसल्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुंबईसह अनेक ठिकाणी रस्ते, दुकाने आदी ठिकाणी गर्दी होती. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, याचाही लोक विचार करताना दिसत नव्हते.

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी संचारबंदीचे आदेश काढा, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. हे आदेश तत्काळ अंमलात आले आहेत. त्यामुळे राज्यात संपूर्ण लॉक डाऊन आहे. संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवानाच मुभा असेल.गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच, याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक सेवेमध्येच खासगी वाहने उतरतील. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल.
या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेवून चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमा शील करण्यात येणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here