मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे नेतृव. मनसेच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचा सपाटा सुरू असून कित्तेक कंपन्यातील कामगारांना न्याय मिळाला आहे, अशातच तरुण बेरोजगार यांच्या हाताला काम मिळावे यासाठी तरुण युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जुळत आहे, आज दिनांक 22 ऑगस्ट ला सकाळी 11.00 वाजता मनसेचे कामगार सेनेच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात लालपेठ, बल्लारापूर, सास्ती गौरी पवणी परिसरातील शेकडो तरुणांनी मनसेत प्रवेश केला, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, विधी विभाग जिल्हाध्यक्ष अजित पांडे, जनहीत शहर अध्यक्ष पियुष धुपे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूरक्याल, बल्लारपूर तालुका अध्यक्ष राज वर्मा इत्यादी मनसे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक पक्षाचे व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मनसेत प्रवेश करण्यास इच्छुक आहे, कारण ज्या पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचे काम सुरू आहे ते काम पाहता या पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळेल अशा अपेक्षा तरुणांना आहे, जिल्ह्यातील पॉवर प्लांट असेल, सिमेंट कंपण्या असेल किंव्हा कोळसा खाणीतील कामगारांच्या समस्या सोडविण्याचे काम असेल मनसेची जिल्हा स्तरीय पदाधिकारी मंडळी ही सर्वात पुढे असतात, त्यामुळे अल्पावधितच डझणभर कंपन्यात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना व वाहतूक सेनेच्या युनिट संघटना उभ्या झाल्या आहे, बल्लारापूर व राजुरा क्षेत्रातील कोळसा खाणी बघता त्या क्षेत्रातील शेकडो तरुणांनी आज मनसे पक्षात प्रवेश केला आहे.