Home चंद्रपूर मनसे झंजावात :- शेकडो कार्यकर्त्याचा मनसेत पक्ष प्रवेश देतोय चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला...

मनसे झंजावात :- शेकडो कार्यकर्त्याचा मनसेत पक्ष प्रवेश देतोय चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला संजीवनी.

शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर मधील शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश,अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात मनसेला उभारणी, मनसे अंगीकृत संघटनेची साथ..

चंद्रपूर :-

जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी विखूरली असली तरी काही मनसे पदाधिकारी पक्षाच्या संघटन बांधणीला महत्व देऊन पक्षात विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालवीत आहे, त्यामुळे मनसेला चंद्रपूर जिल्ह्यात संजीवनी मिळतं आहे, दरम्यान चंद्रपूर शहरातील झोपडापट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर येथे विकास कामे झाली नसल्याने दुर्लक्षित या परिसरात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे हा एकमेव राजकीय पक्ष कामं करू शकतो व मनसेचे पदाधिकारी हे आमचे सगळे कामं करतील हा विश्वास ठेऊन काही तरुणांनी मनसेत प्रवेश केला, या वार्डातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात शेकडो युवक व महिलांचा मनसेत पक्ष प्रवेश घेण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळाबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, महिला सेना अध्यक्षा वर्षा बोंभले व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी शहरातील वार्डावार्डात मनसे पदाधिकारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राबवित असून शहरातील मागास व कामगार वर्ग असलेल्या प्रकाश नगर येथे मनसेची शाखा धुमधडाक्यात उदघाटन करण्यात आली, यावेळी मनसे जिल्हा कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित वार्डवाशी यांना दुपट्टे टाकून मनसेत प्रवेश घेतला, यावेळीमनसे कार्यकारणी जाहीर करण्यात आली, यामध्ये शाखाध्यक्ष साहिल खान, शाखा संघटक ज्ञानेश्वर बांसोड़, सचिव सिद्धार्थ नायक, उपाध्यक्ष भीमराव वनकर, कोषाध्यक्ष सुरेश सिंहठाकुर, सदस्य अंकित मालाकार कन्हैया, आकाश मालाकार, छाया ठाकुर, राजश्री सिद्धार्थ नायक, तृप्ति भीमराव, सरोज यादव, देव कुमार, सोहेल शेख, आसिफ शेख, फैजान शेख, ईरफान शेख, अशफाक खान इत्यादीनी महाराष्ट्र सैनिक म्हणून पदभार स्वीकारला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here