Home चंद्रपूर संतापजनक :- पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत चाललाय डिझेल चोरी व त्यात बायो...

संतापजनक :- पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत चाललाय डिझेल चोरी व त्यात बायो डिझेल मिसळून विक्रीचा खेळ?

ठाणेदार योगेश हिवसे यांना पुन्हा मोठी दुर्घटना होण्याची हौस आहे का? की या परिसराची बिहार सदृश्य परिस्थिती करायची? जनतेचा सवाल.

चंद्रपूर:-

अवैध डिझेलचा व्यवसाय धोकादायक असतो आणि त्यामध्ये अनेकदा भेसळ किंवा इतर चुकीचे घटक मिसळलेले असू शकतात, त्यामुळे तो आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतो, अशा धंद्यांमध्ये लोकांच्या सुरक्षेचाही धोका असतो, कारण ते नियमांचे पालन करत नाहीत, अशीच डिझेल चोरी व अवैध डिझेल विक्री पडोली पोलीस स्टेशन क्षेत्रात जोरात सुरू असून त्या चोरीच्या डिझेल मध्ये बायो डिझेल मिसळून मोठ्या प्रमाणात अवैध व भेसळयुक्त डिझेल विक्रीचा धंदा पडोली परिसरात परप्रांतीय लोकं करतं आहे, या परिसरात परप्रांतीय लोकं ज्यांचेवर बिहार मध्ये गुन्हे दाखल आहेत असे तरुण मुले डिझेल चोरीला अंजाम देत आहे, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेक जाडवाहतूक करणारे हायवा ट्रक, लांब पल्ल्ल्याच्या गाड्या मधून डिझेल चोरी सुरू आहे, एवढेच नव्हे तर ताडाळी येथील इंडियन पेट्रोल डिझेल डेपो मधून येणाऱ्या टैकर मधून सुद्धा डिझेल चोरी सुरू आहे, महत्वाची बाब म्हणजे ह्या डिझेल चोरांना स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे संरक्षण देत असल्याची चर्चा आहे.

चंद्रपूरला लागून असलेल्या पडोली परिसरातील चंद्रपूर नागपूर महामार्गालगत असलेल्या ईगल ढाब्याच्या मागे डिझेल व तेलाचे अवैध गोदाम होते. या गोदामाला काही महिन्यापूर्वी भीषण आग लागली होती, ती आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या. गोदामात उभ्या असलेल्या टँकरलाही आग लागली. याशिवाय सततच्या वाढत्या आगीने शेजारील भंगार दुकानालाही वेढले व काही वेळातच सर्व काही जळून राख झाले. तब्बल चार तास अगीच्या ज्वाला दिसतं होत्या ते अवैध डिझेल चे गोडाऊन परप्रांतीय बिहारीं शाकीर अन्सारी या व्यक्तीचे होते अशी चर्चा होती, मात्र एवढं नुकसान झाल्यानंतर सुद्धा आज ती पुन्हा शाकीर टोळी अवैध डिझेल चोरी व विक्री करताहेत अशी माहिती आहे,

विशेष म्हणजे या पोलीस स्टेशन अंतर्गत तीन तीन अवैध डिझेल च्या टोळ्या आता सक्रिय असून त्यांच्या आपसी संघर्षात टोळीयुद्ध होऊन मोठी घटना घडण्याची शक्यता आहे, अर्थात या परिसरात बिहार सारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती पण दिसतं आहे, मात्र त्यांना स्थानिक पोलीस संरक्षण देत असल्याने हा खेळ जोरात सुरू आहे, दरम्यान “भाडं मे जाये जनता अपना काम बनता.” या पोलीसांच्या भ्रष्ट नितीमुळे जर एखादा मोठा अपघात वा दुर्घटना झाली तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदारी घेणार का? हा खरा प्रश्न आहे..

30 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here