Home Breaking News चंद्रपूरच्या ‘श्री नवयुवक बाल गणेश मंडळाला’ राज्यस्तरीय गौरव — जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक...

चंद्रपूरच्या ‘श्री नवयुवक बाल गणेश मंडळाला’ राज्यस्तरीय गौरव — जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आणि ₹५०,००० चे पारितोषिक पटकावले!

चंद्रपूरच्या ‘श्री नवयुवक बाल गणेश मंडळाला’ राज्यस्तरीय गौरव — जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आणि ₹५०,००० चे पारितोषिक पटकावले!

चंद्रपूर, दि. २३ सप्टेंबर २०२५ :— श्री नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्तनगर, नागपूर रोड, चंद्रपूर यांनी पुन्हा एकदा आपली उत्कृष्टता सिद्ध करत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून ₹५०,००० चे रोख पारितोषिक मिळवले आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत मंडळाने सादर केलेला नदी प्रदूषणावर आधारित प्रबोधनात्मक देखावा विशेष आकर्षण ठरला.

यावर्षी गणपती बाप्पाला नदीच्या रूपात दाखवून “नदीला माता मानतो, मग तिच्यावर कचरा का टाकतो?” असा अत्यंत प्रभावी सामाजिक संदेश देत जनजागृती केली. बाप्पा स्वतः नदी होऊन कचरा परत करताना दाखवण्यात आले, जे भाविकांना मनापासून विचार करायला लावणारे ठरले.

पाच वर्षांपासून सातत्याने पर्यावरणपूरक आणि सामाजिक प्रबोधनात्मक देखावे सादर करणाऱ्या या मंडळाने यावर्षीही आपल्या दर्जाची मोहोर उमटवली आहे. याव्यतिरिक्त मंडळाने ऑपरेशन सिंदूर, जैवविविधता, राष्ट्रीय प्रतीके, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, मोबाईलचे दुष्परिणाम, स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या विषयांवरही लक्षवेधी देखावे सादर केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल चंद्रपूर शहरातील सर्व स्तरातील नागरिक, भाविक आणि सामाजिक संस्थांकडून मंडळाचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

श्री नवयुवक बाल गणेश मंडळाचे हे कार्य निश्चितच इतर मंडळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.