Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- पुन्हा कोळसा चोरीचे प्रकरण आले उजेडात, सबसिडीच्या कोळशाची नागाडा-पडोलीच्या...

ब्रेकिंग न्यूज :- पुन्हा कोळसा चोरीचे प्रकरण आले उजेडात, सबसिडीच्या कोळशाची नागाडा-पडोलीच्या कोल डेपोवर धुमाकूळ?

दलालांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच कोळसा खाणीतून कोळशाची उचल!

कोळसा चोरी :

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा चोरी थांबता थांबत नाही अशी परिस्थिती दिसत असून कोळसा माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे, लघु व मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दरात मिळणारा कोळसा चोर मार्गाने जमा करून तो वाढीव किमतीने काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जातो. फेब्रुवारी महिन्यात असाच चोरीचा कोळसा पोलिसांनी पकडला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशनचे करारच वेकोलीतर्फे रद्द करण्यात आले. त्यामुळे  हे प्रकरण इथेच थांबेल असे वाटत असतानाच आता पेंडिंग (बचत) कोळशाची  उचल करून तो कोळसा पुन्हा नागाडा व पडोली येथील अवैध कोल डेपोवर जमा करण्यात येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरात येथील मेसर्स काठीयावाड  कोल अन्ड कोक कंन्झुमर्स अन्ड ट्रेडर्स असोसिएशन अहमदाबाद या कंपनीला चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलि कोळसा खाणीतून सबसिडी चा कोळसा उचलण्याचे कंत्राट वेकोलीतर्फे देण्यात आले आहे. लघु-मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दरात मिळणारा हा कोळसा संबंधित उद्योगांना मिळायला हवा. परंतु चंद्रपुर-नागपुर येथील कोळसा तस्कर संबंधित वेकोली अधिकार्यांशी संगनमत करून हा कोळसा पडोली व नागाडा येथील अवैध कोल डेपोवर साठा करून नंतर तो खुल्या बाजारात चढ्या दराने विकल्या जातो. या धंद्यात कुप्रसिद्ध कोळसा तस्कर सामील आहेत. नुकताच कोरोना ने घातलेल्या थैमानामुळे केंद्रीय सरकारच्या आदेशाने ट्रान्सपोर्ट (वाहतुक) थांबविण्यात आली होती. परंतु कोळसा खाणीतून  कोळश्याचे उत्खनन मात्र सुरू होते, याच संधीचा लाभ घेत कोळसा तस्करांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत लोडिण्ग करुन ठेवला होता व  संधी मिळेल तेंव्हा कोळसा खदानीतून  ट्रक मध्ये लोड केलेला कोळसा चोर मार्गाने नागाडा व पडोली येथील कोल डेपोवर नित्यनेमाने उतरविल्या जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अद्यापही केंद्र सरकारने कोणत्याही वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. परंतु कोळश्याचे लोडींग ट्रक चोर मार्गाने नागाडा व पडोलीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
या काळ्या धंद्यातून अनेकांनी करोडोंची माया जमा केली आहे. वेकोलि चे भ्रष्ट अधिकारी व संबंधित विभाग यांच्याशी हातमिळवणी करून होणारी ही चोरी आणखीन वाढली असल्याने

अगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोळसा मंत्र्यांना व सीबीआय ला निवेदन दिले होते की कैलास अग्रवाल व इतर कोळसा माफिया व वेकोलि सह महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन नागपूर यांच्या व्यवहाराची सीबीआय चौकशी करा त्यामुळे ते प्रकरण चौकशीत असतांना आता आता पुन्हा तोच प्रकार सुरू असल्याने यामधे सामील बेईमान वेकोलि अधिकारी, कोळसा माफिया यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मनसे तर्फे करण्यात येत आहे. आणि आता ते कोळसा माफिया कोण आहेत त्यांचा शोध घेऊन सीबीआयला तत्काळ ई-मेल द्वारे कळविण्यात येणार आहे.

Previous articleमुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय.
Next articleब्रेकिंग न्यूज :- पुन्हा कोळसा माफियांची कोळसा तस्करी सुरूच ? सबसिडीचा कोळसा ऊतरतोय  नागाडा-पडोली च्या कोळसा टालवर ?*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here