Home महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा...

मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय.

राज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रनामा :-

कोरोनाचा फैलाव सुरुच आहे.कोरोनाचे संकट परतवून लावायचे आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे बाजारात गर्दी करु नका, नियमांचे पालन करा. योग्य सुरक्षित अंतर ठेवा. मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

ते म्हणालेत, राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. ?ववैद्यकीय स्टोअर्स, किराणा दुकान आणि इतर जीवनावश्यक सेवा खुल्या ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने चोवीस तास दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली. दुकानात गर्दी झाल्याने सरकारने यामुळे ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी दुकाने २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला मुख्य सचिव, महापालिका आयुक्त आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. तसेच या बैठकीत सामाजिक अंतर देखील राखले गेले. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली गेली. ?ससर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना चोवीस तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे.मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.

Previous articleपोलिस अधिकारी दिपक मैस्के आणि रायटर लालू यादव यांची गुंडागर्दी !
Next articleब्रेकिंग न्यूज :- पुन्हा कोळसा चोरीचे प्रकरण आले उजेडात, सबसिडीच्या कोळशाची नागाडा-पडोलीच्या कोल डेपोवर धुमाकूळ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here