Home चंद्रपूर आनंदाची बातमी :-“आम्ही घरी पोहोचलो जी” मजुरांनी गावी जाताच केला फोन, ...

आनंदाची बातमी :-“आम्ही घरी पोहोचलो जी” मजुरांनी गावी जाताच केला फोन, कुटुंबात गेल्याचा मजुरांना आनंद !

संचारबंदीचे बळी कामगार ठरू नये ! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

ब्रह्मपुरी चामोर्शी सावली या भागातील शेतमजूर मिरची तोडाई गहू व हरभरा कामासाठी नांदेड जिल्हा किनवट तालुक्यातील कामाला गेले होते, मात्र संचारबंदी लॉक डाऊन झाल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली होती, शेतकरी आपल्या गावाला जा असे म्हणून झालेल्या कामाची मजुरी देऊन त्यांना स्वगावी जायचा सल्ला दिला. पण बस सेवा,  रेल्वे बंद झाल्याने दोन दिवस त्याच ठिकाणी राहून त्या पंचवीस मजुरानी  पायदळ निघन्याचा निर्णय घेऊन मिळेल त्या वाटेने कोरपना या ठिकाणी 30 तारखेला पोहोचले. एका पत्रकाराने जन सत्याग्रह संघटनेच्या अध्यक्षांना माहिती दिली 25 मजूर आवश्यक गरजेचे साहित्य घेऊन चालत होते .130 की.मीटर पायदळी आल्यामुळे त्यांचे शरीर थकले होते. आबिद अली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड मॅडम, ठाणेदार गुरनुले साहेब,यांना माहिती देऊन नगरपंचायतीची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका शाळेमध्ये राहण्याचा बसेरा सुरू करून राहण्याची सोय करून दिली. मात्र जिल्ह्यात आल्यामुळे त्यांची या ठिकाणी राहण्याची मानसिकता नव्हती व कुटुंबाला भेटण्यासाठी व्याकूळ झाले होते दोन वेळेचे जेवणाची व्यवस्था करून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क करून गावापर्यंत पोहोचून देण्याचे त्यांना व्यवस्था करण्यात आली . आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड यांच्या चमूने अंतरगाव, निकधरा ,हिवरगाव, येथील मजुरांची तपासणी करून दिली पोलिसांच्या मदतीने त्यांना अडचण होऊ नये व पालकमंत्र्यांनी मजूरांशी चर्चा करून त्यांना गावापर्यंत पोहोचून दिले. उपरोक्त मजूर सुखरूप गावी पोहोचले म्हणून भ्रमणध्वनी वर कळवून कुटुंबात पोचल्याचे आनंद व्यक्त केला.जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष अबिद अली व दिनेश राठोड व प्रसिद्धी प्रमुख प्रमोद गिरडकर यांनी संबंधित मजुरांना मदतीचा हात दिला.त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here