Home चंद्रपूर क्राईम स्टोरी :- चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गुन्हे पथकाने पकडले अट्टल चोर,...

क्राईम स्टोरी :- चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गुन्हे पथकाने पकडले अट्टल चोर, मुद्देमालासह केली अटक !

आरोपी संदीप मनोहर चौधरी वय २४ वर्ष, इरफान सरवर शेख वय २२ वर्ष, व तनवीर कादीर बेग वय १९ वर्ष सर्व रा महावीर नगर भिवापूर वार्ड चंद्रपूर यांना अटक ! 

शहर पोलिस स्टेशन गुन्हे पथकांचे सर्वत्र अभिनंदन ! 

क्राईम स्टोरी :-

कोरोना संचारबंदीचा फायदा घेवून आता चोर सक्रिय झाले असून बंद असकेले दुकाने त्यांचे प्रमुख लक्ष बनले आहे. दिनांक 31/03/20 रोजी पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे फिर्यादी अब्दुल रज्जाक अली मोहम्मद सुराया रा रहमत नगर चंद्रपूर यांनी तक्रार दिली की बागला चौक चंद्रपूर येथील त्यांच्या कन्फेश्नरी दुकानाला रोज प्रमाणे पाहणी केली असता त्यांच्या दुकानाचे लाकडी दरवाजाचे पल्ले व ताले तुटलेले दिसले व दुकानातील 10, 5, 2, 1 चे कलदार असे एकूण 23650/- रू नगदी कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले, त्यांच्या या रिपोर्ट वरून पो स्टे ला अपराध क्रमांक 243/20 कलम 461, 380 भा द वी चा गुन्हा नोंद करण्यात आला आणि पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी रवाना होवून आरोपीचा शोध सुरू केला.त्यासाठी प्रथम पोलिस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करीत असताना महावीर नगर भिवापूर वार्डातील संशयीत आरोपीचा शोध घेवून विचारपूस केली असता त्यांनीच सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पोलिस स्टेशनला आणून करवाई केली ते आरोपी संदीप मनोहर चौधरी वय २४ वर्ष, इरफान सरवर शेख वय २२ वर्ष, व तनवीर कादीर बेग वय १९ वर्ष सर्व रा महावीर नगर भिवापूर वार्ड चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर चे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पो उप नि सुशील कोडपे, ASI बाबा डोमकावळे, पो.हवा. वंदीराम पाल, किशोर तुमराम, विलास निकोडे, स्वामीदास चालेकर, महेंद्र बेसरकर, सिद्धार्थ रंगारी, ना पो का. पांडुरंग वाघमोडे, पो का. प्रमोद डोंगरे, मंगेश गायकवाड, सचिन बुटले, पंकज शिंदे यांनी करून हा गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्हा 5 तासाचे आत उघडकीस आणल्याने शहर गुन्हे शोध पथकाचे उपपोलिस निरीक्षक सुशील कोडापे व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here